Wednesday, February 28, 2024

Latest Posts

रामदास आठवलेंची Lok Sabha Election संदर्भात महत्त्वाची घोषणा

दिल्ली दरबारी इंडिया आघाडीच्या बैठकीची धामधूम सुरू होती, जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे.

दिल्ली दरबारी इंडिया आघाडीच्या बैठकीची धामधूम सुरू होती, जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपप्रणित (BJP) रालोआ (NDA) चे घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्र सरकारमधील (Central Government) मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेच्या देशभरात २५ जागा आपण लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections ) रिपब्लिकन पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला पाठींबा देणार आहे, हे रामदास आठवलेंनी सांगितल आहे. एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे.

देशभरात रिपब्लिकन पक्षाचे २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशात संघटन वाढत आहे, असं रामदास आठवले म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या २५ जागा लढवणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे अशी माहिती मिळते आहे.

येणाऱ्या निवडणुकीतच्या काळात प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे . आंदोलन, सभा अशा अनेक गोष्टीं आपल्या दिसून येणार आहेत. अनेक राज्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर तसेच दलित, आदिवासी महिला यांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी घडणाऱ्या घडामोडींवर आणि घटनांवर विविध प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या पातळीवर आंदोलन करण्याच्या सुचना रामदास आठवले यांनी यावेळी दिले आहे.एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे. देशभरात रिपब्लिकन पक्षाचे २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशात संघटन वाढत आहे, असं रामदास आठवले म्हणाले. 

हे ही वाचा:

THANE: आता एसटी महामंडळाचे तिकीट DIGITAL स्वरुपात, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार

देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, खासदार संजय राऊतांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss