सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी सरकारवर हल्लबोल केला आहे. आम्ही जी तयारी केलीय ती किमान ३५ ते ४० जागांसाठी आहे. काही प्रमुख नेते शिवसेनेत किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर गणिते बदलणार आहे. लोकसभेच्या किमान ४० जागांवर आम्ही जिंकू हा विश्वास आहे असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, काश्मीरची परिस्थिती ज्याप्रकारे दाखवली जात आहे तशी वास्तव्यात नाही हे मी मानतो, हे सर्व काश्मीरला माहित आहे. तुम्ही संसदेत आणि लोकांमध्ये येऊन भाषण करता, पण काश्मीरमध्ये ३७० हटवल्यानंतर तेथील परिस्थिती चां,गली नसल्याचं संपूर्ण देशाला माहित आहे. जवान आमचे आजही सुरक्षित नाही, पोलिसांची देखील हत्या होत आहे. मेहबुबा मुफ्ती काश्मीरच्या स्थानिक नेत्या आहेत, आमच्यात मतभेद असले तरी त्यांचं म्हणणं खरं आहे. काश्मीरची स्थिती कोण बदलेल? हे सत्ताधाऱ्यांनी सांगावं.
तर लोकसभा संदर्भात राऊत म्हणाले आहेत की, २८ आकडा आतापर्यंत मला सांगितलं, पण आमचा ३५ ते ४० चा आकडा आहे. आम्ही किमान ४० जागांवर लोकसभा निवडणुका जिंकू असा मला आत्मविश्वास आहे, अनेक लोक येणाऱ्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जो पक्ष कुबड्या घेऊन उभे आहेत, त्यांनी ४५ जागांची भाषा करावी हे हास्यास्पद आहे. सर्व्हे वगैरे बाजूला ठेवा, आमचं ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं मिशन आहे. तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरेंना संपूर्ण देशात स्वीकृती आहे. आम्ही मोदी सरकारच्या तानाशाहीविरोधात खुलेपणाने मैदानात उतरणारे आहोत. अदानीच्या विरोधात आम्ही लाखोंचा मोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीचे नेते उद्धवजींचा आदर करतात.
तर पुढे प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे, त्यांचे आणि आमचे भूमिका सारखी आहे, आमच्यात चर्चा नेहमी सकारात्मक होते. कॉंग्रेसच्या स्थापना दिनानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा करू, त्यात जागा वाटपाचा निर्णय होणारच आहे. प्रकाश आंबेडकर असा कोणताच निर्णय घेणार नाही जेणेकरून लोकशाहीची हत्या होईल. जागा वाटपांबाबत आमची चर्चा सुरू आहे. वंचित आणि शिवसेना युती जाहीरच झाली आहे. इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रकाश आंबेडकर यांना इंडिया मध्ये घेण्याचं मत मांडलं होतं, आंबेडकरांना कोणाचाही विरोध नाही. तर पुढे राम मंदिर या मुद्द्यावर बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, राम मंदिरासाठी सर्वात मोठं दान कोणी दिलं असेल तर ते शिवसेनेने दिलं आहे . पहिली देणगी ही शिवसेनेची आहे, एक कोटीची आहे. अयोध्येचा सातबारा हा रामाच्या आणि त्यांच्या भक्ताच्या नावावर आहे, भाजपाच्या नावावर नाही आहे
हे ही वाचा:
शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ
आरक्षणाचा खरा फायदा कुणाला? समाजाला की दोन्हीकडच्या नेत्यांना? |MANOJ JARANGE PATIL| CHHAGAN BHUJBAL
Follow Us