Jyotiraditya Shinde आज कोल्हापूर दौऱ्यावर

जनधन योजनेच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास केला जात आहे अशी भाजपची विचारधारा आहे. जनतेचा सामाजिक आणि व्यक्तिगत विकास केला जात आहे असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

Jyotiraditya Shinde आज कोल्हापूर दौऱ्यावर

जनधन योजनेच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास केला जात आहे अशी भाजपची विचारधारा आहे. जनतेचा सामाजिक आणि व्यक्तिगत विकास केला जात आहे असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांचा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी कामगिरीचा आढावा देखील घेतला आहे. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये २२० कोटीची मोफत लसीकरण करण्यात आले आहे. असे कोणत्याही देशामध्ये घडले नाही असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

पुढे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, आवास योजना राबवण्यात आल्या आहेत. मागील ७५ वर्षांमध्ये पाहिलांदाच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला १२ हजार जमा केले आहेत. आरोग्यासाठी आयुष्यमान पाच लाख रुपयांचा विमा देण्यात आला आहे. महिलांसाठी ९ कोटी ६० लाख महिलांना उज्वला गॅस दिला आहे. ६४ वर्षांमध्ये ७४ विमानातळ होती. परंतु ९ वर्षांमध्ये आणखी ७४ विमानतळ बांधण्यात आली. प्रधानमंत्री योजनेत १ कोटी ३७ लाख लोकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी बेरोजगारीवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जर्मनीसारख्या देशामध्ये मंदीचे सावट आहे असे असतानाही देशामध्ये मोठी रोजगार निर्मिती होत आहे. भारतामध्ये मोठेमोठे प्रकल्प येत आहेत. ते विरोधकांना दिसत नाही त्यांना चष्मा बदलण्याची गरज आहे. असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. भाजपचे काम हे तळागाळापर्यत पोहोचवणे हे माझे काम आहे..

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version