खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना खिचडी घोटाळ्याबाबत भाष्य केले. त्यांनतर शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. खोचाडी घोटाळा झाला आहे, त्यामध्ये ऑन रेकॉर्ड नावं समोर आली आहेत. आमची नावं आली तर आम्ही दोघेही राजकारणाचा त्याग करायला तयार आहोत. पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर मांडीवर घेऊन बसतात का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे राहुल कनाल यांनी केला. आरोप जर खोटे ठरले तर ते राजीनामा देणार का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना विचारला. पत्रकार परिषद घेऊन राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पुरावे दाखवले. तुम्ही जरी सुरु केलं असलं तरीही संपवणार मी. असा इशारा यावेळी त्यांनी दिला. अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल हे खिचडी घोटाळ्यात सामील असून हे या घोटाळ्याचे लाभार्थी आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना केला होता. त्याच मुद्द्यावरून आता शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी ‘आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकारणातून राजीनामा द्या’, असे आव्हान संजय राऊत यांना दिले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
३० जानेवारी २०२४ ला किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची ईडीची चौकशी झाली. पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत, ते भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत.खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा. त्यातली किती लोकं त्या गटांमध्ये गेली आहेत, ते जाहीर करा.लुटीचा पैसा घेऊन संरक्षणासाठी पळालेली ही लोक आहेत. त्यांना पत्रकार परिषद घेऊ द्या, सर्वांचे वस्त्रहरण करतो.असा इशारा संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला. खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे लाभार्थी भाजपात आणि मिंधे गटात आहेत. आम्ही जनतेच्या न्यायालयात त्यांना घेऊन जाणार, खिचडी घोटाळा म्हणता ज्यांनी काम केली, त्याची कंत्राटं आता देवगिरी आणि वर्षा बंगल्यावर आहेत, असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.
हे ही वाचा:
भूमी पेडणेकरचा आगामी ‘भक्षक’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित