Saturday, July 27, 2024

Latest Posts

नेते मंडळी आणि कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होत आहेत, कारण…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता संबंधित निकाल जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप आणि टीका करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबाबतसुद्धा नेमका पक्ष कोणाचा? पात्र कोण आणि अपात्र कोण? याबाबत घेतलेल्या निर्णयावरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्याच अनुषंगाने, राहुल नार्वेकर आता व्यक्त झाले आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचे नॅशनल काँग्रेस पार्टीबद्दलचे मत व्यक्त केले आहे. निर्णय दिल्यानंतर एका गटाला न्याय मिळत असतो. न्यायालयात दाद मागणे हा त्यांचा अधिकार असून मी त्यांना थांबवू शकत नाही. मी निकाल दिला तो घटनेला धरून आणि पुराव्यांच्या आधारे दिला आहे. मी दिलेला निर्णय शाश्वत व जस्टिफाईड आहे. कोणतीही घटनाबाह्य प्रकिया यात दिसत नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. जर का माझा निर्णय चुकीचा किंवा कोणाच्या प्रभावाखाली घेतला असेल तर त्यांनी दाखवून द्यावे. मी घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या गाइडलाईन नुसार आहे पण तरीदेखील बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. मी दिलेला निर्णय हा योग्य आहे, त्यात काही बदल होणार नाही. असेही राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आपल्या विरुद्ध निर्णय आला की अशीच शंका आणि वक्तव्ये केली जातात हे आपण पाहिले आहे. कोणत्याही संस्थेने त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर ते वाईट. त्यामुळे मला त्याचं काही वाटत नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांच्याबाबत म्हटले.

अलीकडे जनता नेते मंडळी आणि कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होत आहेत, तर त्याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित होत अनेक नेते भाजपात जात आहेत. अमिन पटेल यांचा त्या कार्यक्रमाशी काही राजकीय संबंध नव्हता. अमिन पटेल व आमचा मतदार संघ बाजू-बाजूला आहे. एका कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलो होतो. असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अमिन पटेल यांच्या मुद्दयावर मत मांडले.

हे ही वाचा: 

महानंदच्या दूधावरून राजकारण पेटलं!, जितेंद्र आव्हाड संतापून म्हणाले…

बिग बॉस १६ चे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकला ईडीकडून समन्स,नेमकं प्रकरण काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss