Saturday, March 2, 2024

Latest Posts

बलात्काराच्या घटनेमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर, रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा; जयंत पाटलांची टीका

राज्यातील बलात्काऱ्याच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

राज्यातील बलात्काऱ्याच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बलात्काराच्या (Rape Cases) घटनेत आपले राज्य चौथ्या क्रमांकावर आहे सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भारतात पहिल्यादांच राम अवतरत आहे की काय असे वातावरण आहे. रामावर एवढच प्रेम असेल तर सीतामाई संरक्षण करा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) भाजपवर निशाणा साधला आहे. महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांवर चिंता व्यक्त करताना ड्रग्जच्या प्रकरणावर देखील टिप्पणी केली आहे. सध्या उडता पंजाब, उडता महाराष्ट्र झाला आहे.

जयंत पाटील म्हणाले, राज्यात कायदा सुवस्था बिघडली आहे. बिहार राज्याला आपण बोलायचो आता आपल्या राज्यात ती स्थिती आलीय. घटना घडली तर गुन्हा दाखल करायचा नाही. गुन्हा दाखल झाला तर तपास करायचा नाही , ⁠अशी परिस्थिती आहे. सध्या उडता महाराष्ट्र झाला आहे. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला अॅडमिट करतो नंतर त्याला पळून जायला मदत करतो . ही गुन्ह्याची स्थिती आहे.

बीड मध्ये झालेल्या जाळपोळ प्रकरणी जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये घटना घडली त्यावेळी एसपी बीड आणि माझलगाव या ठिकाणी ते नव्हते. ⁠ते फोन बंद करुन बसले होते अशी मला माहीती मिळाली. जिल्हाधिकारी यांच्या अहवालात यांचा उल्लेख आहे ⁠कोणाचा पाठिंबा असल्याशिवाय अस होऊ शकत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

अभिनेत्री कंगना रणौत लढणार २०२४ ची लोकसभा निवडणूक

तुळजाभवानी मातेचे अलंकार गहाळ झाल्याप्रकरणी ७ जणांवर अखेर गुन्हा दाखल, ७ पैकी ५ आरोपी मयत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss