Saturday, July 27, 2024

Latest Posts

मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

आजपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत.

आजपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत.आंतरवली सराटी मधलं हे त्यांचे चौथे आंदोलन आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी करत असलेल्या उपोषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकार अर्धवट काम करत आहे, अर्धवट कामे तर सोडतात, त्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळेच आजपासून मनोज जरांगे यांना उपोषण करावे लागत आहे. पण या आंदोलनाची वेळ यावेळी योग्य नाही. आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) त्यांनी केलेल्या कुणबी प्रमाणपत्रानुसार त्यांना आरक्षणमिळाले पाहिजे. आता राहिला प्रश्न गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा. तर त्यांच्यासाठी मी मनोज जरांगे यांना सांगू इच्छितो आरक्षण हे रस्त्यावरच्या लढाईने तुम्हाला मिळणार नाही. ते जर मिळवायचे असेल तर त्यांना लोकसभेमध्ये जावे लागेल आणि त्यासाठी जरांगे पाटील यांना निवडणूक लढवावी लागेल. तरच तुम्ही या प्रश्नावर निकाल काढू शकता.

दरम्यान, यांवर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी जी भूमिका मांडली ती मध्ये ओबीसीचे ताट वेगळे आणि मराठा समाजाचे ताट जे करायचे आहेत ते वेगळे, अशी भूमिका त्यांनी घेतले पाहिजे. तेव्हा कुठे त्यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने यश येऊ शकतो. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे आज पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवले होते. मात्र, सरकारने या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

राज्यात सध्या अंदाधुंदी चालली आहे. मी अगोदरचं म्हणालो होतो, राज्यात जसे जसे इलेक्शन जवळ येतील, तसं राज्यात अराजकता आपल्याला दिसेल. म्हटल्या प्रमाणे आज त्याचं चित्र समोर आहे. सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलं आहे किंवा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून एकमेकांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी चालले आहे. भाजपची दादागिरी ही काही आजची नाही, ही आधीपासूनच आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा: 

मनोज जरांगेंनी सरकारला वेळ दिला पाहिजे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून बबनराव तायवाडे यांनी दिली प्रतिक्रिया

नाशिक दौऱ्यादरम्यान साल्हेर किल्ल्यावर मनोज जरांगेंसोबत घातपात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss