Friday, April 19, 2024

Latest Posts

मनोज जरांगेंनी सरकारला वेळ दिला पाहिजे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून बबनराव तायवाडे यांनी दिली प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. सरकारने दिलेल्या अध्यादेशाचे कायद्यामध्ये लवकरात लवकर रूपांत व्हावे यासाठी जरांगे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. १७ फेब्रुवारीपर्यंत सरकारने आक्षेप मागवला आहे. कायद्यानुसार १७ फेब्रुवारीपर्यंत जे काही आक्षेप असतील, ते या दरम्यान नोंदवण्यात येणार आहेत. त्यानंतर या सुधारित मसुद्यावर विशेष अधिवेशन बोलवून त्याचे कायद्यात रूपांतर केल्या जाऊ शकतं. जो वेळ या प्रक्रियेला लागतो, तितका वेळ जरांगे पाटील यांनी सरकारला दिला पाहिजे. तसे न होता त्यांनी पुन्हा उपोषण करत आंदोलन करणे, हे आमच्या कळण्याच्या पलीकडे आहे, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी व्यक्त केले आहे.

२६ जानेवारीला मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आले म्हणून त्यांनी मोठा जल्लोष केला. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाला, हे जाहीर केले, गुलाल उधळला.मात्र आजपासून ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी प्रामुख्याने एक मागणी केल्याचे कळते आहे की, सरकारने लवकरात लवकर जो काही प्रस्तावित मसुदा राजपत्रिकेत जाहीर केला आहे, त्याचे कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात यावे. जेव्हा की सरकारने १७ फेब्रुवारी पर्यंत आक्षेप मागवले आहेत. कायद्यानुसार ही एक प्रक्रिया असून १७ तारखेपर्यंत जे काही आक्षेप असतील, ते या दरम्यान नोंदवण्यात येतील. त्यानंतर सरकारला त्याचे निराकरण करावे लागेल आणि नंतर त्या मसुद्यामध्ये नव्याने काय गोष्टी नमूद करायच्या किंवा काय काढायच्या यावर विचार केला जाईल, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

ही सर्व प्रक्रिया झाली की हा संपूर्ण सुधारित मसुदा मंत्रिमंडळामध्ये पारित होईल आणि मग मंत्रिमंडळामध्ये पारित झालेल्या या मसुद्यावर विशेष अधिवेशन बोलवून त्याचे कायद्यात रूपांतर केल्या जाऊ शकतं. अशी ही एकंदरीत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला वेळ लागतो, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. हे ठाऊक असताना देखील वारंवार आंदोलन करून हेच करा आणि असेच करा, असे बोलण्यात काहीही अर्थ नाही, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

हे ही वाचा: 

हिरवे सफरचंद हाडांच्या मजबूतीसाठी ठरतात फायदेशीर,जाणून घ्या फायदे

तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून…उबाठा बरे व्हा, BJP चे ट्वीट व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss