Saturday, May 18, 2024

Latest Posts

MLA DISQAULIFICATION RESULTS LIVE: ऐतिहासिक निकालाच्या वाचनाला सुरुवात, कोण होणार पात्र?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधिमंडळाच्या सभागृहात पार पडत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली असून या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते उपस्थित राहिले आहेत. निकाल वाचनाच्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा केली. महाराष्ट्रातील या निकालाची सर्वांनाच उत्सुकता असून सगळीकडे धाकधूकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. त्यासोबतच, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या वकिलांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. निकालाची प्रत प्रत्येकाला देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

खरी शिवसेना कोणाची आणि व्हीप कोण असणार हा प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे. ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना प्रदान केल्या आहेत. निवडणूक आयोगाने घटनेची एक प्रत दिली आहे परंतु, त्या घटनेवर दिनांक देण्यात आली नाही. विधिमंडळातील बहुमत हा मुख्य मुद्दा आहे. असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर झाल्या दाखल

जिल्हा नियोजन समिती बैठकीत ११२८ कोटी ८४ लक्षच्या आराखड्यास मान्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss