Raj Thackeray यांचा अजित पवारांना टोला, पवारांच्या राजीनाम्यामुळे उकळ्या फुटत होत्या

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा खेडमध्ये (Raj Thackeray in Khed) जाहीर सभा पार पडली.

Raj Thackeray यांचा अजित पवारांना टोला, पवारांच्या राजीनाम्यामुळे उकळ्या फुटत होत्या

Raj Thackeray In Ratnagiri : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा खेडमध्ये (Raj Thackeray in Khed) जाहीर सभा पार पडली. यसभेमध्ये राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे हे मांडले आहेत. तर यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल हा केला आहे. शरद पवरांच्या निवृत्तीचा मुद्दा देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

दिनांक ३ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांच्या या राजीनाम्याला पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून जोरदार विरोध झाला होता. या सर्व गोष्टींनंतर काल दिनांक ५ मे रोजी शरद पवार यांनी काल त्यांचा राजीनामा मागे घेतला. शरद पवारांनी राजरीनामा मागे घेतल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. प्रत्येकजण आपल्या परीने या घटनेमागच्या कारणांचा अंदाज लावू पाहतोय. यावेळी बोलत असताना राज ठाकरे म्हणाले आहेत की, मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला.

तसेच यावेळी राज ठाकरे म्हणाले आहेत की, माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार, असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण सर्वानी पाहिलं. ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असं सगळं त्यांचं सुरू होतं. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होतं. हे सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार. अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस (अजित पवार) असा वागतोय. खरंच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मला पण म्हणेल ए गप्प बस. त्या भितीपोटी, या भितीपाई त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको. अजित पवारांना त्यावेळी जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या. जे होतंय ते बरं होतंय असंच त्यांना वाटत होतं. असं म्हणत यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांना चांगलाच टोला लगावला आहे.

हे ही वाचा : 

दोहा डायमंड लीग जिंकून नीरज चोप्रा जागतिक आघाडीवर

राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version