Wednesday, May 15, 2024

Latest Posts

गुजरातच्या पलीकडे मोदींना देश दिसत नाही; संजय राऊतांची मोदींवर टीका

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ' काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ काँग्रेस न होती तो क्या होता’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हेच गोष्ट पकडत खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत हे मला माहित नाही, त्या संघ परिवाराच्या आहेत की कोण मला माहिती नाही, पण या देशात काँग्रेस नसते तर स्वातंत्र्य मिळालं नसतं. स्वातंत्र्य लढ्यात अनेक काँग्रेसचे नेते उतरले होते आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी लढा दिला होता. काही मतभेद आपले असू शकतात. मात्र, काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावा लागली असती, असे म्हणत भाजपवर टीका केली आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी हे मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते, मात्र या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये गेले नाहीत. याच कारण म्हणजे, तुम्ही अखंड हिंदुस्तानची भाषा करता त्यात मणिपूर येत नाही का? देशाचा पंतप्रधान म्हणजे एक अशी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीला गुजरात पलीकडे काहीच दिसत नाही. त्यामुळे २०२४ मध्ये कायमस्वरूपी त्यांना गुजरात मध्ये पाठवण्याचा जनतेने निर्णय जनतेने घेतला आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे. हे सर्व सत्य आहे ते त्यांनी स्वीकारलं पाहिज. काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व भेटलं नसत. हा देश बुवा महाराज तंत्र मंत्र जादू मंत्र यांच्याकडे गेला आहे. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी या देशाला तुमच्या हातातला मोबाईल इंटरनेट दिले. काँग्रेस नसता तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले ते मोदी यांना बाप जन्मात जमलं नसतं. भाजपने कायम काँग्रेसचे ऋण मानले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

जागा वाटपावर आज किंवा उद्या घोषणा होईल असे संजय राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आम्ही ४ जागांची ऑफर दिली आहे. आम्ही या प्रस्तावासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू. आजच्या भाषेत डायलॉग असे म्हणत आहे. संविधान संकटात असताना सर्वजण आपण समाजाने एकत्र यावे वंचितांचे देखील तीच इच्छा आहे. मी चार जागा संदर्भात प्रस्ताव दिला आहे त्यावर ते विचार करतील. उद्धव ठाकरे यांनी अशा लोकांना योग्य प्रवाहात आणण्याचा काम केलं. मला त्यांच्याविषयी फार निर्णय माहिती नाही. मात्र, हे सर्व लोक सोडून गेलेले हे दुर्दैव आहे, असे आमश्या पाडवी शिंदे गटात गेल्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

बीड जिल्ह्यातील सभेदरम्यान मनोज जरांगे यांच्यावर पाच गुन्हे दाखल, जरांगेंच्या अडचणीत वाढ

‘कुण्या राजाची तू गं राणी’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप,गुंजा-कबीरने शेअर केली भावूक पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss