Wednesday, February 28, 2024

Latest Posts

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

आज दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. यावेळी नागपुरात माध्यमांशी बोलत असताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लबोल हा केला आहे.

आज दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. यावेळी नागपुरात माध्यमांशी बोलत असताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लबोल हा केला आहे. महाराष्ट्र पेटवून भाजपला काय प्राप्त होतं आहे? समजत नाही. सरकार कसं पाप करत आहे. मंत्रीच सांगत आहेत. महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका यांनी घेतली आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले आहेत की, आज राज्यात शासकीय व्यवस्था कोलमडली आहे. सरकारी कर्मचारी, परिचारिका संपावर आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्व समाजाचे शेतकरी आहेत. पण सरकारला जनतेचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी उत्तर देणार? ते समजत नाही. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. शिवरायांचा महाराष्ट्र पेटवला जात आहे. तो शांत केला पाहिजे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

कोणत्याची लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो. तर तिथे पोट निवडणूक घेतली पाहिजे. पण केंद्र सरकारच्या दबावात येऊन निवडणूक आयोग निर्णय घेत नाही. म्हणून न्यायालयाने यांना फटकारलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे. जे आरोप केले जात आहेत. त्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. आज मी लेखी स्वरूपात सर्व पुरावे मुख्यमंत्री शिंदे यांना देणार आहे. आयुक्तांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असंही नाना पटोले म्हणालेत.

राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज्य सरकारमध्ये काय चाललं आहे? यांनी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका घेतली आहे. आज सरकारी व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्र बरबाद करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झालंय. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसावर चर्चा संपली. मुख्यमंत्री उत्तर देतील असे कळत होते पण त्यांनी अजून उत्तर दिलं नाही. उद्या उत्तर देणार असं कळतंय. या लोकांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय, असं म्हणत पटोलेंनी घणाघात केलाय.

हे ही वाचा : 

KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…

लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss