Saturday, July 27, 2024

Latest Posts

नरेंद्र मोदी हे राम राम करत जनतेला मरा मरा करत आहेत: भास्कर जाधवांची नरेंद्र मोदींवर टीका

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत या दौऱ्यामध्ये ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि पदाधिकारी आहेत. रत्नागिरी येथे ठाकरे गटाच्या जनसंवाद कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) सरकारवर जोरदार टीका केली आहे. भास्कर जाधव म्हणाले, अयोध्येत नरेंद्र मोदी यांचे मोठे कटाऊट लावण्यात आले. मध्ये बाल अवस्थेत श्रीराम नरेंद्र मोदी यांचा बोट धरून जाताय. ही श्रीरामाची बाल अवस्थेतील मूर्ती का? कारण सगळ्यात मोठे मोदी त्यांना दाखवयाचे आहे. मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार हे भासावायचे आहे. रामचंद्रमध्ये मोठे की नरेंद्र मोदी मोठे? नरेंद्र मोदी हे राम राम करत जनतेला मरा मरा करत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध राहा, असे म्हणत भास्कर जाधव यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलतांना भास्कर जाधव म्हणाले, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १ आणि २ फेब्रुवारीला रायगड दोऱ्यावर होते. त्यानंतर आता ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे या दौऱ्या दरम्यान सभा आणि प्रमुख स्थळांना भेटी देत आहेत. भेटी गाठी आणि इतर कार्यक्रमासाठी या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जनसंवाद असे नाव आहे पण साहेबांचे भाषण ऐकण्याकरीता जनता येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घराणेशाही संपवायची आहे. तर उद्धव ठाकरे साहेब म्हणाले मला माझ्या घराणेशाहीचा अभिमान आहे. आजकाल सर्वांच्या हातात मोबाईल आहे. त्यावरून कळत आहे की, कोणते विषय घेतायत आणि ते मांडले जातायत. मला आता महत्वाच्या विषयावर लक्ष वेधायचे आहे. २२ तारखेला अयोध्येत रामाची प्रतिष्ठापणा झाली. आपण त्याच स्वागत केले. भरभरून आनंद वाहत असताना अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून मलाही काही प्रश्न पडले आहेत. राम मंदिराचा इव्हेंट केला. मार्केटिंग तिकडे केली, असे भास्कर जाधव म्हणाले.

मला प्रश्न विचारायचा होता. तुम्ही मोठे मार्केटिंग केले आहे. त्या कार्यक्रमाचा यजमान कोण? या देशाच्या प्रथम नागरिक या राष्ट्र्पती मूर्मु मॅडम आहेत. त्या त्यावेळी कुठे होत्या. याच उत्तर पंतप्रधान यांनी दिले पाहिजे. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती कुठे होते? तो सरकारी कार्यक्रम होता तर सरकारचे मंत्री कुठे होते? राममंदिर व्हावे म्हणून प्रत्येकाच्या घरातील एक एक वीट गेलेली आहे. राम मंदिरामध्ये तुमची कुठेही श्रद्धा नाही. मला प्रश्न विचारायचा आहे भाजपला की, पौष महिन्यात लग्न करायला किंवा बोलणी करायला जाऊ नको लग्न ठरलेले असले तरी भेटायला जाऊ देत नाहीत. मग पौष महिन्यात राम चंद्राची का स्थापना केली. पौष महिना अशुभ मानला जातो तर का केले? याला रामाच राजकारण केले जातंय, असा म्हणत भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा: 

Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले २० मोठे निर्णय

 गाजराच्या साली पासून बनवा ‘हे’ खास पदार्थ,जाणुन घ्या फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss