Saturday, March 2, 2024

Latest Posts

नरेंद्र मोदींचा लोसभानिवडणुकीला घेऊन नवीन नारा

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून नवा नारा देण्यात आला आहे. 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं' असा शब्दात नवा नारा आता भाजपकडून दिला जातो आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून नवा नारा देण्यात आला आहे. ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं’ असा शब्दात नवा नारा आता भाजपकडून दिला जातो आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात शुक्रवार २२ डिसेंबर पासून दिल्लीत भाजपच्या बैठकांचं सत्र सुरु होणार आहे. त्याचसाठी दोन दिवसीय बैठकांच्या आयोजन करण्यात आलं असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार असं समजत आहे.

सम्पूर्ण देशभरात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आताच पाच राजांच्या निवडणूका पार पडल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपने देखील लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून आता जोरदार नारेबाजीला देखील सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

दिल्लीत भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये विकसित भारत संकल्पच्या बरोबरच छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात मिळत आहे. खरतंर भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे. पण तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसने बाजी मरूउन दाखवली हे आपण सर्वानीच पहिले आहे.

येत्या नवीन वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांच्या विधानसभा या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात करणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भाजपची लोकसभा निवडणुकांसाठीची पहिली यादी येऊ शकते. असं देखल म्हंटल जात आहे.

हे ही वाचा:

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी केला मोठा दावा, निवडणुका धनुष्यबाणावर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss