Friday, May 17, 2024

Latest Posts

नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र बोगस, संजय राऊत खोटं बोलतात, वेळकाढूपणामुळे जागावाटप रखडलं; प्रकाश आंबेडकर

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये युती संदर्भातल्या चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये युती संदर्भातल्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अजूनही कोणत्याही पक्षासोबत युती झालेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर महाराष्ट्रात राजकीय चर्चाना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आपापसांत मतभेद असल्याने जागा वाटप रखडले आहे. त्यामुळे त्यांनी आधी मतभेद मिटवावे. आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे, काँग्रेसने त्यांचा इगो बाजूला ठेवावा. नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्यांनी आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा रखडली असून त्यासाठी वंचित जबाबदार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. माविआमध्ये १० जागेंवरून अनेक मतभेद सुरु आहेत. त्यातील पाच जागा अश्या आहेत की त्या जागेवरून तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाही. पाचही जण जागा मागत आहेत. महाविकास आघाडीमधील भांडण जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत जागावाटप होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. आधी तुमच्यातील भांडण मिटवा, असे ते म्हणाले. काँग्रेस प्रभारी रमेश यांना मी पत्र लिहिलं आहे. सगळी हकीकत मी लिहलं आहे. आम्ही समजोता करायला तयार आहे पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेलं नाही. महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा आम्ही करतो.

नवनीत राणा या बिगेस्ट फ्रॉड असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राणांचे जात प्रमाणपत्र हे बोगस असून काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे, त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. महाविकास आघाडीकडून वंचितला पाच ते सहा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र त्या कोणत्या जागा असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, याआधी अनेक बैठका घेऊनसुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. या जागा वाटपावरून प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

टेलिव्हिजन विश्वात स्पृहा जोशीचे कमबॅक,झळकणार नव्या मालिकेत

अमरावतीमध्ये प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमावाने केलेल्या दगडफेकमध्ये २५ जणांवर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss