Saturday, July 27, 2024

Latest Posts

Nawab Malik यांच्या अडचणी वाढणार? फडणवीसांच्या पत्रानंतर आज तपास यंत्रणा कोर्टात जाण्याच्या तयारीत…

काल दिनांक ७ डिसेंबर २०२३ पासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात ही झाली आहे. एकूण १० दिवस हे अधिवेशन चालणार आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल पासून सगळीकडे नवाब मलिक यांच्याच नावाची चर्चा ही चालू आहे.

काल दिनांक ७ डिसेंबर २०२३ पासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात ही झाली आहे. एकूण १० दिवस हे अधिवेशन चालणार आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल पासून सगळीकडे नवाब मलिक यांच्याच नावाची चर्चा ही चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर हजेरी लावल्यानंतर विधानसभेत आणि राज्यामध्ये सुद्धा अक्षरशः रणकंदन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा दिवस नवाब मलिक यांच्याभोवती फिरत राहिला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी एक लेटरबॉम्ब टाकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या मुद्द्यावरून सध्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत.

आता नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यावरून अजित पवार गट आणि भाजप शिंदे गट यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच तपास यंत्रणा सुद्धा आता नवाब मलिकांविरोधात पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडे आड तिकडं विहीर अशा मनस्थितीत अडकण्याची चिन्हे आहेत. नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपास यंत्रणा कोर्टात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन करत असल्याचा तपास यंत्रणाचा आरोप आहे.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला होता. तो दोन महिन्यांसाठी आणखी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांची ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल एक वर्ष पाच महिन्यांनी जेलमधून सुटका झाली होती. सातत्याने त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करत न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने त्यांना केवळ आणि केवळ नाजूक प्रकृती असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यांच्याकडून जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून होत आहे. त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा तपास यंत्रणा न्यायालयामध्ये जाऊन मलिक यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss