Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

बुधवार दिनांक ३१ मे २०२३ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे कार्यक्रमला हजार होते. यावेळी बोलत असताना त्यांनी देशातील हिंदू मंदिरांबाबत मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

बुधवार दिनांक ३१ मे २०२३ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे कार्यक्रमला हजार होते. यावेळी बोलत असताना त्यांनी देशातील हिंदू मंदिरांबाबत मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आत अनेक ठिकाणी चर्चाना उधाण हे आले आहे.

यावेळी बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही उत्तराखंडमधील पिथौरागढमधून बाहेर पडणाऱ्या कैलास मानसरोवर मार्गाचा ८० ते ८५ टक्के भाग बनवला आहे. पूर्वी नेपाळमधून जावे लागे आणि या दरम्यान तापमान उणेमध्ये होते. यामुळे खूप त्रास व्हायचा. यावेळी गडकरींनी हिंदू मंदिरांबाबतही वक्तव्य केले. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “मला वाटतं की आपला देश असा आहे जिथे विशेषत: हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. तेथे धर्मशाळा चांगल्या नाहीत. मी लंडन आणि इटलीसह परदेशात अनेक देशांमध्ये गेलो. येथील गुरुद्वारा, मशीद आणि चर्चचे वातावरण पाहून मला वाटले की आपली प्रार्थनास्थळेही अशीच असावीत. मला संधी मिळताच मी महाराष्ट्रात १२ हजार कोटी रुपयांचा पालखी बाजार बांधला.

तसेच नितीन गडकरी पुढे म्हणाले आहेत की, प्रकल्पांना होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) अचूक करण्याची गरज आहे. अधिकृत निवेदनानुसार, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, गडकरी यांनी बुधवारी (३१ मे) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकार्‍यांशी बैठक घेतली आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

हे ही वाचा:

Coconut Water Face Spray ने करा नियमित Skin Care, त्वचा ही उजळेल…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version