Thursday, May 16, 2024

Latest Posts

मागचे व्हीडीओ काढून गलिच्छ राजकारण करतायत, Dhananjay Munde यांचा Sharad Pawar यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाचे नेते कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी धाराशिव येथे बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. “काहीजण मतांसाठी आम्हा बहीण भावांचे जुने व्हिडिओ काढून गलिच्छ राजकारण करत आहेत,” अश्या शब्दांत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार यांच्यामावर अप्रत्यक्ष टीका करत ते म्हणाले, ” २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्हा बहीण भावाची एकमेकांच्या विरोधात लढत झाली. आता कुटुंब एकत्र झालं आहे. असं असताना काहीजण मतांसाठी जुने व्हिडिओ काढून गलिच्छ राजकारण करत आहेत. त्यांच्या डोक्यात जातीपातीचे राजकारण भरलेले आहे.” पुढे ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे ७८ आमदार असताना स्वर्गीय आर आर पाटील मुख्यमंत्री होणार होते. पण त्यांना मुख्यमंत्री का केले नाही? हा प्रश्न आहे. तत्कालीन नेतृत्वाने आर आर आबाच्या रुपाने आलेली संधी का गमावली? हा प्रश्न विचारावा वाटतो,” असा सवाल करत मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना टोला लगावला आहे.

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आणि ६ देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली. सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “कांदा निर्यात बंदीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकार आचारसंहितेनंतर आर्थिक मदत करणार आहे.”

दरम्यान, मराठा आरक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले, “मराठा आरक्षणाविषयी महायुती सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढला आहे. तरीही काहीजण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करताना दिसत आहेत. पण, त्यांना यश आलेलं दिसत नाही,” अशी टीका देखील मुंडे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray Live: कोकण हे शिवसेनेचे हृदय, गद्दारांचे दोन मालक दिल्लीत…

जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, विकास करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – Imtiyaj Jaleel

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss