Friday, April 26, 2024

Latest Posts

Coconut Water Face Spray ने करा नियमित Skin Care, त्वचा ही उजळेल…

आपलयाला उन्हळ्यात अतिउष्णतेमुळे त्वचेचे विविध विकार होतात. हे विकार लवकर बरे व्हावेत म्हणून आपण अनेक उपाय करतो. तसेच यासाठी आपण हॉस्पिटल मध्ये देखील अतोनात पैसे खर्च करतो.

आपलयाला उन्हळ्यात अतिउष्णतेमुळे त्वचेचे विविध विकार होतात. हे विकार लवकर बरे व्हावेत म्हणून आपण अनेक उपाय करतो. तसेच यासाठी आपण हॉस्पिटल मध्ये देखील अतोनात पैसे खर्च करतो. परंतु तरी देखील हे त्वचेचे चे विकार बरे होत नाहीत. उन्ह्याळ्यात उष्णेतेपासून बचाव करण्यासाठी आपण अनेक महागडे स्किन केअर लोशन, जेल आणि मॉइश्चरायझर वापरतो. म्हणूनच आज आम्ही खास तुमच्या साठी घरगुती स्किन केअर स्प्रे घेऊन आलो आहोत. जे वापरल्याने कोणतेही त्वचेचे विकार होणार नाहीत तसेच आपल्याला ताजे तवाने सुद्धा वाटेल.

कोकोनट वॉटर म्हणजेच नारळाचे पाणी प्यायला प्रत्येकालाच आवडते. नारळाचे पाणी पायल्याने आपल्या शरीराला अनेक जीवनसत्व तसेच पोषक सत्व मिळतात. नारळाचे पाणी आपल्या शरीरासाठी मोठ्या प्रमाणात गुणकारी ठरते. म्हणूनच आज आम्ही तुमच्या साठी नारळाच्या पाण्यापासून तयार झालेले स्किन केअर घेऊन आलो आहोत ज्याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील काळी वर्तुळे नाहीशी होतील. तसेच चेहऱ्यावर मोठ्याप्रमाणात ओलावा टिकून राहील.याशिवाय आपला चेहरा उजळण्यास मदत होईल. नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि प्रोटीन (Protein) सारखे अनेक अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या नाहीशी होते. चला तर मग जाणून घेऊयात Coconut Water Face Spray कसा तयार करावा.

कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

नारळ पाणी एक कप
काकडी

कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्याची कृती –

नारळाचे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करण्यासाठी प्रथम काकडी घ्यावी.
घेतलेली काकडी चांगली धुवून तसेच किसून घ्यावी.
यानंतर काकडीचा रस काढून एका भांड्यात ठेवावा.
मग त्यात एक कप नारळ पाणी घालावे.
यानंतर हे दोन्ही एकत्र चांगले मिक्स करावे .
नंतर तयार झालेले मिश्रण म्हणजेच स्प्रे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
अशा प्रकारे Coconut Water Face Spray तयार आहे. चांगला रिझल्ट मिळण्यासाठी या स्प्रे चा नियमित झोपताना वापर करावा.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

शिरपूरच्या तृप्तीची आधुनिक हिरकणी सारखीच गोष्ट

किल्ले रायगडावर घडली मोठी दुर्घटना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss