Friday, April 19, 2024

Latest Posts

लोकसभेसाठी आम्हाला जागा द्यावी हा आमचा आग्रह, आम्हाला सिरियसली घ्यावे – रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवलेंनी (Republican Party of India chief Ramdas Athawale) आज मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवलेंनी (Republican Party of India chief Ramdas Athawale) आज मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, मी भाजपच्या चिन्हांवर लढणार नाही. आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे. मी युतीमधून बाहेर पडणार नाही. आम्हाला सुद्धा जागा मिळणार आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांनी आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. निवडणूक आयोगाने आज शरद पवार यांना तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यांनी तुतारी वाजवून त्यांचा प्रचार करावा. आमचं कमळ लोकांपर्यंत पोहचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे. वयोवृद्ध नागरिकांना उपोषण करायला लावू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी मनोज जरांगे यांना केले आहे.

भाजप आमच्यासोबत दुजाभाव करत करतो असे काही नाही. चौथा पाय हा आरपीआयचा आहे. हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आम्हाला सिरियसली घ्यावे, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. शिर्डी आणि सोलापूर लोकसभेची जागा रामदास आठवले यांनी महायुतीकडे मागितली होती. आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहेत. मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा सोडली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले होते.

महायुतीमधून मला लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी द्यावी. मी शिर्डी मतदार संघातून दोनदा निवडून आलो. तिसऱ्यांदा मला पराभव पत्करावा लागला. मी शिर्डी मतदार संघातून दोनदा खासदार झालो होतो. त्यामुळे मला परत एकदा शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. मात्र अद्याप, आरपीआयला भाजपने कोणताही शब्द दिलेला नाही. त्यामुळे आता रामदास आठवले कोणत्या मतदार संघातून लढणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

हे ही वाचा:

सत्ताधाऱ्यांनी केली जोरदार टीका, ठाकरेंची मशाली पेटणार नाही अन् पवारांची तुतारी वाजणार नाही!…

निवडणूकीचे काम सोपे करून जबाबदारपणा वाढवणारा मतदार संपर्क ॲप – Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss