Saturday, July 27, 2024

Latest Posts

अदानी समूहाविरोधात ठाकरेंची डरकाळी, उद्या निघणार भव्य मोर्चा

उद्या दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी ठाकरे गटाचा मोठा मोर्चा होणार आहे. अदानी समूहाविरोधात हा मोर्चा घेण्यात येणार आहे.

उद्या दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी ठाकरे गटाचा मोठा मोर्चा होणार आहे. अदानी समूहाविरोधात हा मोर्चा घेण्यात येणार आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यासाठी ठाकरे गटाने जय्यत तयारी केली आहे. उद्याच्या मोर्च्याचा निमित्ताने धारावी सज्ज झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मोर्चा होणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. उद्याचा हा मोर्चा भव्य असणार आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आम्ही काळजी घेऊ. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत लोकांमध्ये संभ्रमाचा वातावरण आहे. झोपडपट्टी पुनर्विकास केला जातो त्याबद्दल स्पष्टता नाही. केवळ अदानींना फायदा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून विकास केला जात आहे, अशी माहिती बाबूराव माने यांनी दिली. धारावीत ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तसेच झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. धारावीतील प्रत्येक घरातून माणसं मोर्चाला नेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असून या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार बाबूराव माने यांनी या मोर्चाची माहिती दिली आहे. टी जंक्शन ते अदानी समूहालाच्या कार्यालयापर्यंत आमचा भव्य मोर्चा उद्या निघेल. या मोर्चात एक ते दीड लाख लोक सहभागी होतील. मुंबईतील अनेक नेते या मोर्च्याच्या शेवटी संबोधित करतील. पोलिसांनी परवानगी दिली नाहीतरी आम्ही या मोर्चावर ठाम आहोत, असं बाबूराव माने यांनी सांगितलं.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही मोर्चा होणारच असं म्हटलं आहे. मोर्चा फक्त धारावीसाठीच नाही तर मुंबईकरांसाठी आहे. सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. मोर्चा होणारच. या मोर्चाला मुंबईकर उपस्थित असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss