Saturday, July 27, 2024

Latest Posts

POLITICS: दिल्लीपुढे महाराष्ट्राला झुकवू नका, ROHIT PAWAR यांचा सरकारला इशारा

सरकारकडे जाऊन EWS प्रमाणे आरक्षण देण्याची मुभा राज्य सरकारला होती पण ते त्यासाठी तयार नाहीत. मोठमोठे प्रकल्प गुजरात व आसामला नेले गेले, महाराष्ट्राला मागे ठेवण्याचे प्रयत्न मुद्दामहून होत आहे का?

नागपूर (NAGPUR) येथील हिवाळी अधिवेशन २०२३ (WINTER SESSION 2023) संपल्यानंतर आमदार रोहित पवार (ROHIT PAWAR) यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे व युवांचे कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत. याबाबतची खंत यावेळी रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

आरोग्य विभागात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार सुरु आहे, याला राज्य सरकार उत्तर देणार का? कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या अधिकाऱ्यांना २० ते २५ हजार रुपये मानधन व १० हजार रुपये इन्सेन्टिव्ह मिळवून दिले जाते. ३ हजार रुपये मंत्र्यांना दिले तरच १० हजार रुपये दिले जाते अशी अवस्था आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून (MAHATMA PHULE JIVANDAYINI SCHEME) जर पैसे काढायचे असतील तर त्या रुग्णालयाकडून दहा टक्के पैसे घेतले जातात. स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटत आहेत, तलाठी पदासाठी ३० लाख रुपये घेण्यात आले; त्यात देखील हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. पेपर फुटीचा कायदा आणण्यासाठी तीन महिन्याची अभ्यास समिती नेमली, प्रयत्न केले असते, तर तो कायदा दहा दिवसात झाला असता, असे यावेळी रोहित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी (MARATHA RESERVATION) फेब्रुवारी पर्यंत फक्त वेळ वाढवून घेतलेली आहे. भुजबळ साहेब पुन्हा मोठमोठ्या सभा घेऊन भडकाऊ वक्तव्य करणार नाहीत, यावर ते काहीच बोलले नाहीत. जातनिहाय जनगणना न करता सरकार इम्पेरीकल डाटा किती वेळेत गोळा करणार? याबद्दल त्यांनी काहीच सांगितले नाही. केंद्र सरकारकडे जाऊन EWS प्रमाणे आरक्षण देण्याची मुभा राज्य सरकारला होती पण ते त्यासाठी तयार नाहीत. मोठमोठे प्रकल्प गुजरात व आसामला नेले गेले, महाराष्ट्राला मागे ठेवण्याचे प्रयत्न मुद्दामहून होत आहे का? सर्वसामान्यांचे हित न जपता सरकारकडून स्वतःचे हित जपले जात आहे. सरकारने गुजरातबद्दल जरा कमी विचार करावा व दिल्ली (DELHI) पुढे महाराष्ट्राला झुकवू नका. असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

POLITICS: मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

MAHARASHTRA: कायद्यात बदल, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास DOCTOR दोषी नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss