Saturday, March 2, 2024

Latest Posts

नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

काल दिनांक ७ डिसेंबर २०२३ पासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात ही झाली आहे. एकूण १० दिवस हे अधिवेशन चालणार आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल पासून सगळीकडे नवाब मलिक यांच्याच नावाची चर्चा ही चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर हजेरी लावल्यानंतर विधानसभेत आणि राज्यामध्ये सुद्धा अक्षरशः रणकंदन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा दिवस नवाब मलिक यांच्याभोवती फिरत राहिला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी एक लेटरबॉम्ब टाकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या मुद्द्यावरून सध्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. तर आता या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका ही मांडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनाही सुनावले आहे. विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही. नवाब मालिक तुरुंगात असताना ते महाविकास आघाडीत मंत्रीपदावर होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना या मुद्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहीत व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे, असं सांगतानाच जनहिताचा, लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील, अशी आशाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss