Wednesday, February 28, 2024

Latest Posts

LIFESTYLE: MAKEUP करायच्या ‘या’ टिप्स तुम्हाला माहिती आहेत का?

मेकअप करताना काही बेसिक टीप जर पाळल्या नाहीत तर तुमचा मेकअप त्वचेवर चांगला ब्लेंड होत नाही. यामुळे तुमची त्वचा तुम्हाला खूप विचित्र वाटू शकते.

मेकअप  (MAKEUP) करताना तुम्ही काही बेसिक टिप्स फॉलो केल्या तर तुमचा लूक चांगला दिसू शकेल. पण त्याच टिप्स तुम्ही नीट पाळल्या नाहीत तर तुमचा पूर्ण लुक बिघडू शकतो. मेकअप केल्याने तुमच्या त्वचेच्या समस्या काही काळ  लपून राहतात आणि त्यासोबत तुमच्या चेहऱ्याचे डाग लपून तुमचा चेहरा प्रफुल्लित दिसतो. चेहऱ्याचे फीचर्स मेकअप मुळे चांगल्या प्रकारे हायलाईट होतात. परंतु, मेकअप करताना काही बेसिक टीप जर पाळल्या नाहीत तर तुमचा मेकअप त्वचेवर चांगला ब्लेंड होत नाही. यामुळे तुमची त्वचा तुम्हाला खूप विचित्र वाटू शकते. मग मेकअप साठीच्या योग्य टिप्स कोणत्या आहेत?  हे आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया.

१. जर तुमचा रंग खूप गोरा असेल तर तुम्ही जड फाउंडेशन टाळले पाहिजे. टीटेंड मॉइश्चरायझर (Moisturizer) आणि शीअर फाउंडेशन (Shear Foundation) तुम्हाला नैसर्गिक लुक देऊ शकेल. हे फाउंडेशन तुमच्या त्वचेवर चांगले मिसळेल आणि तुमचा लूक अधिक खुलून दिसेल.

२. जर तुमचे डोळे लहान असतील तर डोळ्याच्या बाहेर कोपऱ्यात ओढून वरच्या बाजूला आय लाइनर (Eye liner) किंवा काजळ पेन्सिल लावली तर तुमचे डोळे थोडे मोठे दिसतील. तसेच, खालच्या बाजूला मस्करा (MASCARA) लावा आणि दोन ओळी एकत्र केल्या तर तुमचे डोळे अधिक उठून दिसतील.

३. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पावडरवर आधारित ब्लश (BLUSH) तुम्ही वापरले पाहिजे. यामुळे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल शोषले जाईल. याशिवाय ब्लशर (BLUSHER) वापरण्यापूर्वी तुम्ही त्यावर थोडीशी टालकम पावडर सुद्धा लावू शकता.

४. डोळ्यांभोवती कन्सिलर (Concealer) आणि फाउंडेशन सेट करण्यासाठी एक लहान ब्रश सैल पावडर (Loose powder) मध्ये बुडवा आणि हलकी पावडर डस्ट करून घ्या यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसेल.

५. संध्याकाळच्या पार्टीसाठी डोळ्यांना स्मोकी लुक (Smokey look) दिला तर तुमचे डोळे खूप छान दिसतील. यामुळे तुमच्या वेस्टर्न आऊटफिट सोबत स्मोकी लूक परफेक्ट दिसेल. स्मोकिंग लूक लक्षात घेऊन तुम्ही आयशाडो (Eyeshadow) जास्त स्मज करू नका.

अशाप्रकारे या बेसिक टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होईल. 

हे ही वाचा:

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ‘बॉक्सिंग डे’ का साजरा केला जातो, जाणून घ्या सविस्तर माहिती

हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्यापासून सावध राहायचं असेल तर,संत्री ठरु शकतात फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss