Saturday, July 27, 2024

Latest Posts

POLITICS: खोटं आणि रेटून बोलायची त्यांना सवय आहे, काय म्हणाले AADITYA THACKERAY?

आमदार आदित्य ठाकरे (AADITYA THACKERAY) यांनी दिशा सॅलियन एसआयटी प्रकरणाबाबत सरकारवर टीका केली आहे. आताचे सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असून, ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांनाच बदनाम करायचं असा खेळ सध्या सुरु असल्यचे आमदार आदित्य ठाकरे (AADITYA THACKERAY) यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, सरकार ३१ डिसेंबरला (31 DECEMBER) पडणार असल्याची भविष्यवाणीही आदित्य ठाकरेंनी केली.

युवा सेनेच्यावतीने ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव (GOREGAON) येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. सध्या मुंबई (MUMBAI) आणि महाराष्ट्रा (MAHARASHTRA) ची लूट सुरु आहे. मुंबईतले वरळी (WORLI), दहिसर (DAHISAR) आणि इतर अनेक प्रकल्पांचे काम अपूर्ण  राहिले आहे. हे सरकार आम्हाला उत्तर देत नाही, आणि दिल्लीला (DELHI) उत्तर देत आहे. मुंबई महापालिकेला (MUMBAI MUNICIPAL CORPORATION) आम्ही उत्तर विचारत आहोत, पण त्यांच्याकडूनसुद्धा आम्हाला उत्तर मिळत नाही. हा मुद्दा आम्ही अधिवेशनात घेऊ, पुढील लढाई कोर्टात नेऊ. आमचं सरकार असताना प्रत्येक प्रकल्प संदर्भात प्रत्येक एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो चर्चा करायचो, प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करायचो. ऑक्टोबरच्या आसपास वरळी शिवडी कनेक्टर व्हायला हवा होता. मात्र अजून झाला नाही, असे अनेक प्रकल्प आहेत .जे लवकर पूर्ण होणार होते मात्र या सरकारचे लक्ष नाही. खोक्यांसाठी अनेक प्रकल्प लेट केले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर केली आहे.

सरकारकडून यंञणेचा गैरवापर होत आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या एफडी नक्कीच वाढवले असतील. पण घाबरू नका ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आहे.  पालिकेला दक्षिण मुंबईच्या रोड संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत मात्र अजूनही उत्तर दिले नाही. ज्यांची त्यांनी भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचं ते काम करतात. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय आहे. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला तसं मुंबई विकू देणार नाही. आरक्षणचा  मुद्दा आहेच मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही गुजरातच्या हिताचे आहे. असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

 हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss