Saturday, July 27, 2024

Latest Posts

THANE: अधिकाऱ्यांनीच केले शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्पातील धान्य लंपास

ठाणे जिल्ह्यातील (THANE DISTRICT) शहापूर (SHAHAPUR) तालुक्यात कोट्यवधींचा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. शहापूर तालुक्यातील साकडबाव गावातील आदिवासी विकास प्रकल्पात असलेले हजारो क्विंटल धान्य अधिका-यांच्या संगनमतानने परस्पर लंपास करण्यात आले आहे. याप्रकरणी, आदिवासी विभागाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, उपप्रादेशिक व्यवस्थापक आणि विपणन निरिक्षकांसह ६ जणांवर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साकडबाव गावातील आदिवासी विकास प्रकल्पात असलेले हजारो क्विंटल धान्य शेतकऱ्यांच्या नावे खोट्या चलन पावत्या बनवून बोगस खरेदी करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.

शहापूर (SHAHAPUR )तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पातील हजारो क्विंटल धान्य हे गायब झाले आहे. विशेष म्हणजे साकडबाब केंद्रात धान्य आणि बारदान खरेदीच्या बोगस पावत्या सापडल्या असून या विभागाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, उप- प्रादेशिक व्यवस्थापक आणि विपणन निरीक्षक यांनीच ते लंपास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गरिबांच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या या अधिकाऱ्यांना नेमके कुणाचे अभय आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांनीच केलेल्या या घोटाळ्यामुळे पुरवठा विभागाचे पितळ उघड झाले आहे. त्यामुळे धान्य वितरण व्यवस्था सुरळीत व पारदर्शी असल्याचा कांगावा करणाऱ्या पुरवठा विभागात किती आलबेल आहे; हे या निमित्ताने स्पष्ट होते. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आपल्या अधिकाऱ्यांवरच वचक नाही. याउलट अशी परिस्थिती ठेवली तरच आपले भले करून घेण्यात या विभागाची मानसिकता दिसून येते. शेतकऱ्यांना बरीच मेहनत करून पिकांचे संगोपन करावे लागत असते. वारा, पाऊस, पाण्याची समस्या, न मिळणारा मोबदला, डोक्यावरचे कर्ज यांसारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असते. सर्व संकटाना पार करून आलेल्या धान्याबाबत अधिकाऱ्यांकडूनच असा धोका मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद किन्हवली (KINHAVALI) पोलीस स्थानकात करण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss