Saturday, July 27, 2024

Latest Posts

POLITICS: मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल कधी करणार?, VARSHA GAIKWAD यांचा सवाल

आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून प्रश्न-उत्तर आणि आरोप-प्रत्यारोप करायला विधानसभेत सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण विभाग, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्यात शालेय शिक्षण, पोषण आहार आणि त्यावरील कारवाई याबद्दल खडाजंगी पाहायला मिळाली. मुलांना सकस आहार दिला जात नाही, त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल कधी करणार? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत विचारला. यावेळी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यावर अंतिम कारवाई करू, असे उत्तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. चेंबूर येथील आणिक गाव महापालिका शाळेत पोषण आहारातून विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेला दोन महिने उलटले, तरी सरकारी प्रयोगशाळेचा अहवाल अजून यायचा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या मंडळींना का वाचवलं जात आहे. याबरोबरच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासंदर्भात या सरकारच्या उदासीनतेचा निषेध मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला.

एखाद्या बिल्डरची नजर जेव्हा एका लोकवस्तीवर पडते, तेव्हा त्याठिकाणी विविध यंत्रणेला हाताशी घेऊन दहशतीचं वातावरण कसं निर्माण केलं जातं. हे दृश्य आपण अनेकदा चित्रपटात पाहिलं आहे. दुर्देवानं मोदानींची एन्ट्री धारावीत झाल्यापासून तसाच काहीसा प्रकार धारावीकरांना प्रत्यक्षात अनुभव करावा लागतोय. सरकारच्या मित्र असलेल्या अदानींच्या स्वार्थासाठी धारावीत दहशतीचं राजकारण केलं जातंय. निवृत्त पोलीस अधिकारी, निवृत्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट यांच्यामार्फत लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठल्याही पात्रतेचे निकष ठरल्याविना. कुठल्याही सुनावणीशिवाय, विविध शासकीय यंत्रणेद्वारा इथल्या घरांना निष्काशनाच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. सर्व काही मनमानी पद्धतीनं चाललं आहे. नुकताच रेल्वेच्या माध्यमातून परिसरातील संजय गांधी नगर, समता नगर इथल्या रहिवाशांना नोटीस देऊन कार्यवाहीची भीती दाखवली जात आहे. याविरुद्ध आज काँग्रेसनेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांची बाजू मांडली. 

सरकारने आणि त्यांच्या मित्र व्यावसायिकाने हे ध्यानी ठेवावे. ही धारावी आहे.. धारावी.. आम्ही घाबरणार नाही, आमच्या हक्काच्या धारावीसाठी आम्ही संघर्ष करत राहणार. हम डरेंगे नहीं, हम लड़ेंगे और जीतेंगे मोदानी हटाओ, धारावी बचाओ, मोदानी हटाओ, मुंबई बचाओ…असा इशारा प्रा.वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला. 

हे ही वाचा:

भारतीय क्रिकेटसाठी 2023 हे वर्ष किती सुखकर होते? जाणून घ्या ५ चांगल्या आठवणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss