Wednesday, February 28, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी गेले मात्र दुसरे गेलेच नाही – जयंत पाटील

शरद पवार या संदर्भात आंदोलनात सहभागी झाले आहेत. ⁠सरकरच्या धोरणामुळे अस्मानी आणि सुलतानी संकट वाढवण्यात काम सुरू आहे. कधी एक उपमुख्यमंत्री जातात तर कधी दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहे.

राज्यात बळीराजा संकटात असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात निवडणुकांच्या प्रचारासाठी गेले होते. आपला संसार फाटलेला आणि दुसऱ्याचा संसार जोडायला गेले. पंतप्रधाना ⁠मोदींचा करिष्मा असताना या मंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी काय केले? मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी गेले मात्र दुसरे गेलेच नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) उपमुख्यमंत्री अजित पवारांनालगावला. त्यानंतर जयंत पाटलांच्या टोल्यावर अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. अजित पवार म्हणाले, मी जाऊन काय दिवा लावला असता. जे आहे ते मोदींच्या नावावर आहे.

राज्यातील शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. सरकारला फक्त ईव्हेंटमध्ये नेहमी राहायला आवडते. ट्रिपल इंजिन आल्यावर जोरात चालण्याऐवजी ट्रबलच पाहायला मिळत आहे. ⁠अर्धवट दुष्काळ जाहीर करुन तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. सरकार मात्र गांभीर्याने पाहत नाही. अनेक ठिकाणी पंचनामे सुरु केलेले नाहीत. ⁠मात्र मंत्री शेजारच्या राज्यात प्रचाराला गेले होते. आपला संसार फाटलेला आहे आणि दुसऱ्यांचा संसार जोडायला गेले. मोदींचा करिष्मा असताना या मंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी कशाला गेले? मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री गेले पण दुसरे गेलेच नाही. तुमचा तीन राज्यात विजय झाला. तुम्ही प्रचाराला जाऊन काय उपयोग? असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे.

अजित पवारांनी जयंत पाटलांच्या प्रश्नाला उत्तर देताना मिश्किल टिप्पणी केली. “मी जाऊन काय दिवा लावला असता. जे आहे ते मोदींच्या नावावर आहे”, असे अजित पवार म्हणाले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, हेच‌ मी सांगतो, यांनाही सांगा, मोदींमुळं सर्व काही आहे. दिवाळीच्या आधी आग्रीम देतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र शेतकऱ्यांना नाही मिळाली. बोगस बियाणे विकली तर विक्रेत्यावर कारवाई केली जाईल असा फतवा काढला. मात्र ज्या कंपनीकडून घेतली त्यावर कारवाई करा. ⁠मुलांना रोजगार नाही त्यात हे ⁠मंत्र्यांचे अधिकारी त्यांच्या दारात जाऊन बसले तर काय होणार वसुलीच केली जाणार आहे.

टाटा बिर्ला यांच्या मालावर निर्यातशुल्क लावा : जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, कांद्याच्या निर्यातीवर टक्के दर लावण्यात आला आहे. टाटा बिर्ला यांच्या मालावर लावत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालावर बंदी घालता. ⁠शरद पवार या संदर्भात आंदोलनात सहभागी झाले आहेत. ⁠सरकरच्या धोरणामुळे अस्मानी आणि सुलतानी संकट वाढवण्यात काम सुरू आहे. कधी एक उपमुख्यमंत्री जातात तर कधी दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss