spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

आज दिनांक १० मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) मतदान होणार आहे.

Karnataka Election 2023 : आज दिनांक १० मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) मतदान होणार आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ६ वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या वर्षीच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील ५ कोटी ३१ लाख मतदान करणार असून हे मतदान राज्यातील २,६१५ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

कर्नाटकातील ५८,५४५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण ५,३१,३३,०५४ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. मतदारांमध्ये २,६७,२८,०५३ पुरुष, २,६४,००,०७४ महिला आणि ४,९२७ इतर आहेत. राज्यात ११,७१,५५८ तरुण मतदार आहेत, तर ५,७१,२८१ शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत आणि १२,१५,९२०. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. एकूण २,६१५ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांमध्ये २,४३० पुरुष, १८४ महिला आणि एक उमेदवार दुसऱ्या लिंगाचा आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं असून राज्यभरातील एकूण 58,545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात येत आहे. मतदानादरम्यान एकूण ७५,६०३ बॅलेट युनिट (BU), ७०,३०० कंट्रोल युनिट (CU) आणि ७६,२०२ व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.

कर्नाटक निवडणुकीसाठी बड्या उमेदवारांमध्ये पहिले नाव राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांचे आहे, जे शिगगाव विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी रामनगर जिल्ह्यातील चनापटना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी हातमिळवणी करणारे भाजपचे माजी नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हुबळी धारवाड (मध्य) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र हे शिकारपुरा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे हे चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss