spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

अजित पवार यांच्याविरोधात पक्षात बंडाची तयारी ?

जित पवार यांना त्यांच्या पक्षातून बंडाचा इशारा दिला आहे. हा इशारा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी,

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. विरोधी पक्षातील सर्व नेते हे सत्ताधारी पक्षाकडे जात असल्याचे चित्र हे दिसून येत आहे. कालच काँग्रेस हे नेते म्हणून ओळखले जाणारे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश हा केला आहे. याआधी बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा हे देखील सत्ताधारी पक्षात सहभागी झाले आहेत. हे तिन्ही नेते विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे सदस्य होते. विरोधी पक्षातून सत्ताधारी गटात येण्यासाठी चढाओढ सुरु असताना एक सत्ताधारी पक्षातला नेता विरोधी पक्षात जाऊ शकतो.विरोधी पक्षातील अनेक नेते सध्या शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. परंतु आता एक वेगळंच चित्र सध्या समोर आले आहे. राष्ट्रवादी पक्षातून बंडाचे चित्र समोर आले आहे.

हे सर्व सुरु असताना अजित पवार यांना त्यांच्या पक्षातून बंडाचा इशारा दिला आहे. हा इशारा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील, असा थेट इशारा देणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी थेट रवींद्र पाटील यांनी ट्विट केले. एका प्रकारे अजित पवार यांनाच हा थेट इशारा दिला आहे. आता पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात? हे पहावे लागणार आहेत. तर दुसरीकडे आता कार्यकर्त्यांनी थेट पक्षातून बाहेर पडण्याच्या दिलेल्या इशारानंतर अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss