spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा घेतली आणि अनेक मुद्द्यांना हात घालून त्यांनी भाषण गाजवले. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर राज ठाकऱ्यांचे भाषण झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा घेतली आणि अनेक मुद्द्यांना हात घालून त्यांनी भाषण गाजवले. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर राज ठाकऱ्यांचे भाषण झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल या बाबत आधी पासूनच जनतेमध्ये चर्चा रंगली होती. तर राज यांनी रिफायनरीवर सविस्तर भूमिका कशी मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. आणि अगदी त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी बरसू आणि रिफायनरी संबंधी बाजी मारली. आणि कोकणवासीयांना तुच्या जमिनी किती महत्वाच्या आहेत हे त्यांनी उलगडून सांगितले. मांडली.तसेच राज ठाकरे यांनी satellite आणि बरसू विषयावर कोकणवासीयांना आणि संपूर्ण जनतेला त्यांनी या संबधी अधिक माहिती सांगितली. तसेच राज ठाकरे यांनी समृद्धी महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गाची तुलना देखील केली.

राज ठाकरे यांनी कोकणात समृद्धी झालीच नाही आणि त्यामुळे अनेक प्रश्नांना कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे त्याचे मूळ स्वतः कोकणवसायी आहे कारण त्याच त्याच प्रतिनिधींना तुम्ही निवडून देत असल्यामुळे हे प्रश्न तुमचे प्रलंबित राहिले आहेत. तसेच जेव्हा मी २००७ साली कोंकणात आलो होतो तेव्हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून सुरूच आहे. रस्त्याची दुर्दशा अजूनही तशीच आहे. मुंबई गोवा महामार्गावरून रस्त्यावर खड्डे तसेच आहेत. काँक्रीटीकरण का होत नाही असा सवाल उंची लोकप्रतिनिधींना विचारला का गेला नाही? त्याच बरोबर समृद्धी महामार्ग हा अगदी झटपट सुरु होऊन त्यावरून शिर्डी पर्यंत सुखकर प्रवास करता येत आहे अशी तुलना राज ठाकरे यांनी केली.

जेव्हा मी २००७ साली कोंकणात आलो होतो तेव्हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून सुरूच आहे. मी जेव्हा मुंबई-गोवा महामार्गावरुन गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. अहो त्या रस्त्याचं एकदा बघा. मला बोलले तुम्ही नितीन गडकरी यांच्याशी बोलून घेता का, मी बोललो त्यांच्याशी. नितीन गडकरी यांना फोन केला. इतकी वर्ष झाली रस्ता पूर्ण होत नाही. त्यावर म्हणाले, त्याचे कंत्राटदार पळून गेले. पळून गेले?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. २००७ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. पण अजून काम सुरु झालं नाही. काय करताय तुमचे आमदार, खासदार, काय करताय तुमचे लोकप्रतिनिधी? कारण त्याच त्याच लोकांना तुम्ही निवडून देत आहात. त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, काम केलं किंवा नाही केलं काय, ही माणसं निवडून देणारच आहेत. खाचखळग्यातून जाणारे तुम्ही, तुमच्याबद्दल या लोकांना आपुलकी शुन्य आहे. २००७ ला सुरु झालेला हा प्रकल्प १६ वर्षानंतरही तयाप झालेला नाही. असं म्हणत राज ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाशी तुलना केली. तोच समृद्ध महामार्ग बघा, नागपूर पासून मुंबईपर्यंत, आता नाशिक, शिर्डीपर्यंत आला, सुरुही झाला ते सुद्धा चार वर्षात. नागपूर ते शिर्डी पुढचं काम सुरु आहे.

हे ही वाचा : 

Raj Thackeray Live Speech : BARSU मध्ये कातळ शिल्प आढळ्यास डेव्हलोपमेंट होऊ शकता नाही

Raj Thackeray यांचा अजित पवारांना टोला, पवारांच्या राजीनाम्यामुळे उकळ्या फुटत होत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss