Tuesday, April 23, 2024

Latest Posts

रोहित पवारांच्या अंगात रक्त वाहत नाही जातीयवाद वाहतोय, गोपीचंद पडळकरांची पवारांवर टीका

राज्यभरात सगळीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.

राज्यभरात सगळीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) धनगर आरक्षणासाठी एकातरुणाने आत्महत्या केली होती. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाकडे रोहित पवारांचा एकतरी प्रतिनिधी गेलाय का? मराठा आरक्षणाचा प्रश्न आल्यावर सर्वात आधी आझाद मैदानावर रोहित पवार गेले, हा प्रश्न पेटवावा म्हणून तुम्ही तिथे हजर राहिलात. म्हणून रोहित पवारांच्या अंगात रक्त वाहत नाही तर जातीयवाद वाहतोय, असे म्हणत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील मांडली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने आता सर्व लढाईसाठी तयार राहिले पाहिजे. धनगर आरक्षणासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक केली. धनगर आरक्षणासाठी १२ फेब्रुवारी ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारले आहेत. त्या सर्व प्रश्नांनाची उत्तर १२ तारीखला देणार आहे. या महिन्यात धनगर आरक्षणाचा निर्णय कोर्टातून लागेल, असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ(Nationalist Congress leader Chhagan Bhujbal) यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. १७ नोव्हेंबर ला ओबीसी मेळाव्यापूर्वीच छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, छगन भुजबळ यांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक आहे. नवीन शब्द आला सगेसोयरे, आधी पैसे देऊन बोगस सर्टिफिकेट घेतले जात होते. ओबीसीच्या आरक्षणावर हात लावत नाही, तर संविधानाचा ढाचा जेसीबीने उधळून लावला जात आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात असताना सगेसोयरे हे नवीन आहे. अधिसूचना काढून सरकारने घोडचूक केलीय,असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा:

Gautami Patil च्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पाहायला मिळाला गोंधळ

Chhagan Bhujbal यांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगे म्हणाले, दुसरा विदूषक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss