लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. आता गौतमी इतकी फेमस झाली आहे की , तिचे नृत्य ठेवल्याशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते. गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. तसेच गौतमी सोबत तिची गाणी देखील तितकीच जास्त चर्चेत आहेत. तसेच गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा, गोंधळ या गोष्टी आल्याच. नुकतचं उदगीर (Udgir) येथे गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यासाठी सगळेच लोक हजेरी लावतात. असच काहीस चित्र उदगीर (Udgir) येथे आपल्याला दिसून आले आहे. पण या कार्यक्रमांना तुफान गोंधळ देखील झाला आहे. गौतमी पाटील यांच्या दिलखेच नृत्यावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. यात काही तरुणांच्या नृत्यामुळे पाठीमागील लोकांना दिसत नव्हतं. यातून काही खोडसाळ तरुणांनी समोरील तरुणावर दगड मारले. या प्रकारामुळे एका तरुणाच्या डोक्यात मागील बाजूस दगड लागल्याने तो जबर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. एकाच वेळी अनेक ठिकाणी गोंधळ सुरू असल्याने नेमकं काय झालं हे कोणालाही लक्षात आलं नाही. प्रचंड गोंधळातच कार्यक्रम पार पडला. तसेच नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवरवर चढले होते.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भाजप नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर गौतमीच्या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) तसेच उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांच्या अनेक राजकारणी लोकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यक्रम स्थळी नेत्यांची मोठी बॅनर लावण्यात आली होती.
हे ही वाचा:
#PoonamPandey ट्रेंडमध्ये पोलिसांची पोस्ट होतेय व्हायरल, तुम्ही काही विशेष प्रकरण नाही…
Chhagan Bhujbal यांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगे म्हणाले, दुसरा विदूषक…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स