Saturday, July 27, 2024

Latest Posts

आरएसएस-भाजप अ‍ॅक्शन मोडवर; फडणवीसांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा होणार आहे.

मुंबईतील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आज दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र राज्या समन्वय आणि भाजप नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी भाजपा नेते आणि संघ पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून या बैठकीला सुरवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या लोकसभेचे वारे वाहत आहेत, त्यामुळे संघ आता अॅक्टिव्ह मोडवर आला आहे. शनिवारी देखील याच ठिकाणी बैठक पार पडली होती. तर, शनिवार आणि रविवार दोन दिवस संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. यात सरकारची कामगिरी आणि लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून देखील जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे. तसेच, कोणत्या मतदारसंघात भाजपला प्रतिसाद मिळत असून, कोणत्या मतदारसंघात आणखी काम करण्याची गरज आहे याचा सतत आढावा घेतला जात आहे. तसेच, थेट बूथ निहाय कार्यकर्त्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील मंत्री आपापल्या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

१५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचा स्फोट होईल; रविकांत तुपकरानी दिला सरकारला इशारा

POLITICS: देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार, MANOJ JARANGE यांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss