Saturday, July 27, 2024

Latest Posts

१५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचा स्फोट होईल; रविकांत तुपकरानी दिला सरकारला इशारा

सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईमध्ये बैठक झाली.

सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईमध्ये बैठक झाली. मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली. रात्रीच्या साठे आठ ते दहा अशा दीड तास झालेल्या जम्बो बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या केंद्राकडून सोडवून घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आतमध्ये प्रश्न सुटले नाहीतर १५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचा स्फोट होईल असा इशारा दिला आहे.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाऊस येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये सोयाबीन-कापूस आणि शेतकऱ्यांच्या अन्य समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक झाली आहे. यावेळी सोयाबीन दरवाढीसाठी पामतेलावर आयात शुल्क लावण्याचे तसेच यंदा सोयापेंड आयात न करण्याचे आणि सोयापेंडच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकार तातडीने घेणार असल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी आश्वासन दिले. 

खाद्यतेलामध्ये पामतेल मिक्स करण्यावर बंदी घालण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे. सोयाबीन-कापसाचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरूपी अभ्यासगट स्थापन करून वर्षातून दोनदा बैठक घेण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. या बैठकीत कांदा निर्यातबंदीला तीव्र विरोध करीत निर्यातबंदी मागे घेण्याची आग्रही मागणी रविकांत तूपकर यांनी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना तुपकर यांनी सरकार समोर मांडल्या आहेत. कांद्याबाबत निर्णय न घेतल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा:

POLITICS: खोटं आणि रेटून बोलायची त्यांना सवय आहे, काय म्हणाले AADITYA THACKERAY?

BSP अकाश आनंद मायावती यांचा उत्तराधिकारी ठरला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss