Saturday, May 18, 2024

Latest Posts

चिन्हाबाबत सुनावणी सुरू असतानाच संजय राऊत आले बाहेर, काही न बोलताच…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. त्यामध्ये पुढील सुनावणीसाठी १४ फेब्रुवारी तारीख सरन्यायाधीश वाय . एस. चंद्रचूड (Y. S. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला. त्यानंतर शिवसेना नक्की कोणाची ? आणि शिवसेनेचे धनुष्यबाण (bow and arrow) हे चिन्ह कोणाचं? या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) दिल्ली येथे सुनावणी चालू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात याबाबत सुनावणी सुरु आहे.पण सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून काहीही न बोलता मागच्या दाराने निघून गेले. कायमच पत्रकारांशी बोलणारे संजय राऊत यावेळी मात्र माध्यमांशी न बोलता निघून घेले.

निवडणूक आयोगामध्ये शिंदे गटाकडून महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तीवाद केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप पांडे (Anup Pandey) आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्यापुढे सुनावणी करण्यात आली. दोन्ही पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांसंदर्भात युक्तीवाद करण्यात आला.

पक्षावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Faction) २० लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज निवडणूक आयोगासमोर सादर केले आहेत. त्याशिवाय, ठाकरे गटाने सुमारे तीन लाख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. जिल्हा प्रमुखांपासून ते शाखाप्रमुख, गटप्रमुखांचा समावेश आहे. तर, दुसरीकडे मागील महिन्यात शिंदे गटाने १० लाख ३० हजारांच्या आसपास प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. आणखी १० लाख प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता.

हे ही वाचा:

बायकोच्या जीवावर आम्ही राजकारण करत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

हे ३ तरुण बुमराह, शमी आणि भुवनेश्वरला देणार टक्कर, विश्वचषक २०२३ साठी स्पर्धा सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss