संजय राऊतांनी केली फडणवीसांवर खोचक टीका, मला त्यांची दया येते त्यांच्यावर जी वेळ…

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल हा केला आहे.

संजय राऊतांनी केली फडणवीसांवर खोचक टीका, मला त्यांची दया येते त्यांच्यावर जी वेळ…

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल हा केला आहे. तसेच यावेळी बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, गजानन कीर्तिकर हे आम्ही एकत्र असताना आमचे फार जवळचे सहकारी होते. त्यांनी सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायी होतं परंतु आज ते बोलत आहेत. त्यांच्या गटाबरोबर सापत्न वागणूक मिळत आहे हे आम्ही काय वेगळं सांगत होतो. भाजप बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी सापत्न वागणूक करत होते, म्हणून शिवसेना वेगळी झाली.

आतापर्यंत जे जे त्यांच्यासोबत गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकलं. आता त्यांना कळत असेल की शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती या मगरीन पासून दूर होण्याची गरज आहे. तसेच जे फुटलेले आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहेत फूट झालेल्या गटामध्येच आता दोन गट पडलेले आहेत. जपने त्यांचा मूळ स्वभाव आणि त्यांची मूळ भूमिका सोडलेली नाही. जर गजानन कीर्तिकरांसारखा आमचा जुना सहकारी तिथे जाऊन सुद्धा सुखी नाही म्हणजेच भारतीय जनता पक्षांना कोंबड्यांचा खुराडा पाळला आणि एक एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे. असं म्हणले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीमध्ये आहेत आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत ते देखील हेलपाटे मारत आहेत. देवेंद्र फडणवीस कडे काय जबाबदारी आहे मला माहित नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आता ते उपमुख्यमंत्री झाले आहेत त्यानंतर ते फुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्यांच्या गाड्या चालवत होते नक्की त्यांच्याकडे काय जबाबदारी दिली आहे, ते पहावं लागेल मला त्यांची दया येते त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे त्याबाबत मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

अर्बन नक्षलवाद वाढत असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री असताना जी दंगल उसळली या महाराष्ट्रात तेव्हा सुद्धा हाच आरोप केला होता. अर्बन नक्षलवाद अजून तुम्ही मोडून काढू शकला नसाल तर तो तुमचं अपयश आहे तुमच्या व्यवस्थेविरोधात हे बंड आहे. नक्षलवादाच्या प्रकरणात खोट्या प्रकरणात लोकांना अडकवून त्यांना नक्षलवादी दहशतवादी ठरवून राज्य करत आहात त्याच्या विरुद्ध हा उठाव आहे असं राऊत म्हणाले आहेत.

पुढे संजय राऊत म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे या पद्धतीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जे फक्त पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही ही महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे आम्हाला जनतेला तोंड द्यावं लागेल. आमच्या संपर्कात ते आहेत आपलं दुःख सांगतात आमच्याशी बोलतात. अशा लोकांसाठी देशात सगळ्याच पार्टीमध्ये दरवाजे बंद असले पाहिजेत.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version