देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिले सडेतोड उत्तर

आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिले सडेतोड उत्तर

आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

तसेच यावेळी बोलत असताना अजय राऊत म्हणाले आहेत की, हुकूमशहा नेहमी ठाम असतो. लोकशाही मार्गाने विचारला प्रश्नाला हुकूमशाही उत्तर देत नाही. लोकशाही मार्गाने उचललेला आवाज ते चिरडून टाकतात विरोधी पक्षाची मागणी नेमकी काय ? उद्धव ठाकरे यांनी काल चांगली भूमिका मांडली आम्ही विरोधी पक्ष नसून देशभक्त आहोत आम्ही लोकशाहीवादी आहोत आणि देशभक्तीला विरोध करणारे हे सत्ताधारी आहेत. नव संसद भवन जे उभारला आहे त्याला आमचा विरोध नाही, त्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे. राष्ट्रपती यांचा तो अधिकार आहे राष्ट्रपती आणि संसद मिळून पुढच्या सगळ्या प्रक्रिया सुरू होतात. आपण फक्त पॉलिटिकल इव्हेंट साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री याचे उद्घाटन करायचं ठरवलं आहे. यामुळे देशाच्या घटनेवर संविधानावर हल्ला होतो यामुळे आम्हाला विरोध आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः द्रौपदी मूर्म्यु यांना राष्ट्रपती भवनात जाऊन निमंत्रित करावे असं देखील राऊत म्हणाले आहेत.

लोकशाहीवादी आणि देशभक्तांना दिल्लीत आता बोलवतच नाहीत असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणले आहेत की, जे चमचे चाटुगिरी करतात, जे मोदींच्या भजन मंडळात सहभागी होतात त्यांना बोलावलं जातं. जर राष्ट्रपतींना तुम्ही बोलवत नाही तर ठाकरेंचा तुम्ही काय उल्लेख करता ? असा सवाल देखील उपथित केला आहे. राष्ट्रपती या संसदेच्या प्रमुख आहेत त्यांनाच तुमच्या पंतप्रधानांनी बोलवलं नाही. तुम्ही राष्ट्रपतींनाच बोललो नाही तर आमच्यासारख्यांची काय अवस्था आहे ? त्यामध्ये न बोलता जाणारे पंगती मध्ये बसणारे अनेक लोक आहेत ते चालले असतील. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणत्याही व्यक्तीला विरोध केला नाही भूमिकांना त्यांनी विरोध केला आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

तसेच संजय राऊत पुढं म्हणाले आहेत की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाळासाहेब शिकण्याची आमच्यावर वाईट वेळ आली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं बाळासाहेबांनी बेईमानांना कधीच मांडीवर घेतलं नाही. गद्दारांना हाकलून द्या असे ते म्हणायचे. देवेंद्र फडणवीस हे गद्दारांच्या गाड्या चालवत होते. काय वेळ फडणवीस यांच्यावर आली आहे. तीन दिवसाचा दौरा करून पंतप्रधान भारतात आले आहेत लोकतंत्र्याच्या गोष्टी करून ते आले आहेत पण आपल्या देशाच्या लोकतंत्र्याबद्दल सुद्धा विचार त्यांनी करावा. सापनाथ आणि नागनाथ ची पूजा इथे लोक करतात. अध्यदेश येतोय तो पडला पाहिजे यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू आमच्याकडे आकडा आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहे. 

हे ही वाचा:

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

Gautami Patil चा नादच खुळा!, थेट लग्नाच्या वाढदिवसाला नाच-गाण्याचा कार्यक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version