Friday, April 26, 2024

Latest Posts

Gautami Patil चा नादच खुळा!, थेट लग्नाच्या वाढदिवसाला नाच-गाण्याचा कार्यक्रम

गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. परंतु आता तर थेत लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला गौतमीचा नाच-गाण्याचा कार्यक्रम हा ठेवण्यात आला आहे.

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. आता गौतमी इतकी फेमस झाली आहे की , तिचे नृत्य ठेवल्याशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. परंतु आता तर थेत लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला गौतमीचा नाच-गाण्याचा कार्यक्रम हा ठेवण्यात आला आहे.

राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे या गावातील एका बहाद्दराने लग्नाच्या २५ 25 व्या वाढदिवसाला “चार चाँद” लावण्यासाठी थेट नर्तकी गौतमी पाटीलच्या नाचगाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले. एकीकडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर दुसरीकडे, गौतमीच्या कार्यक्रमाने अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गौतमी पाटीलचा नाच गाण्याचा कार्यक्रम आणि वाद असे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, एका संघटनेकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा मिळूनही कार्यक्रम शांततेत पार पडला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप त्या संघटनेने केला होता. गौतमीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा युपी, बिहार होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता.

तसेच गौतमीसाठी एका पठ्ठ्यानं असा काही खर्च केला आहे की त्याला काही तोड नाही. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये रासपचे नेते आबा मोठे यांच्या वाढदिवशी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक्रमात इतर कार्यक्रमांप्रमाणे वाद व्हायला नको किंवा काही दंगा व्हायला नको या उद्देशाने आयोजकांने थेट पैसे देऊन अतिरिक्त पोलिस सुरक्षा तैनात केली होती. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी अतिरिक्त सव्वा पाच लाख रुपये मोजावे लागले. गौतमीच्या कार्यक्रमासाठी पेड बंदोबस्त बंधनकारक नाही, पण वाद नको म्हणून आयोजकांनी पाण्यासारखा पैसा ओतला.

हे ही वाचा : 

करिअरमध्ये आईची भक्कम साथ…, सईने सांगितलं आईसोबतचे नातं

क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण डीके शिवकुमार की सिध्दरमैया? दिल्लीत फैसला | Karnataka Election 2023

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss