काल दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशन सुरु असताना संसदेत एकच गदारोळ झाला. दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसत असलेल्या बाकांवर उडी घेतली अन् लोकसभेत एकच गोंधळ उडाला. यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व घटनेनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे तर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. या सर्व घडामोडीनंतर आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणले आहेत की, आताची वास्तू संसदभवन वाटतच नाही. संसदेची नवीन इमारत माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. सीमा, सीमावर्ती राज्य, लोक आणि आता काल संसद… सरकारची आता वाचा गेली आहे. सरकार मुक आणि बधीर झालं आहे. ते निवडणूक प्रचार आणि शपथविधी यात व्यस्त आहेत. आता जनतेला समजलं असेल की हे सरकार किती तकलादू पायावर उभं आहे… आता जनतेला समजलं असेल जम्मू काश्मीर, लढाख, म्यानमार मधे अतिरेकी कसे घुसतात, असं राऊत म्हणाले.नवी संसद माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. जुनी संसद मात्र अधिक सुरक्षित होती. संसदेत जाताना एक फिल यावा लागतो तो तिथं येत नाही. मला जुन्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रसाद, नेहरू बसलेले दिसत होते. इथं तसं काही दिसत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
राऊत म्हणाले, बेरोजगारी, महागाई या विषयावर सरकार बोलायला तयार नाही. फक्त धार्मिक राजकारण केलं जातंय. धर्म, राममंदिर याच विषयावर तिन्ही राज्यात भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाल्याचं कालच्या संसदेतील घटनेतून कळतं.तीन राज्यांच्या विजयानंतरही बेरोजगारीसारखे प्रश्न आजही आहे. तसेच पुढे माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे. काल त्या तरुणांनी गॅलरीतून उड्या मारल्या. कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कुठंही जाऊ शकतं हे काल दिसलं. ज्या तरुणांना पकडलं. त्यांचा मार्ग चुकीचा… त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या होत्या. त्यांना वडे तळायला देखील कुठ जागा नाही. त्यातील एक मुलगी PHD करत आहे. तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
हे ही वाचा :
KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…