ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊत यांची सवय आहे, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांवर टीका केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी बैठक सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुक आणि भाजपाची पक्ष बांधणीसाठी ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जनसंपर्क कसा वाढवावा याबाबत ते मार्गदर्शन करत आहेत. तिथे उपस्थित असलेल्यांना ते योग्य वाटले. यावर बोलण्याचा अधिकार भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे. पण स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊत यांची सवय आहे, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलतांना नितेश राणे म्हणाले, महागड्या गाड्यांबाबत कोण बोलत आहे. संजय राऊत यांना आठवण करून देतो, त्यांचे मालक, कुटुंब आणि त्यांच्या सवयी आमच्यासारख्या २९ वर्ष सोबत राहिलेल्या लोकांना माहित आहे. तुमच्या गाड्या, जेवण, कपडे या सर्वांची आम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय मर्सिडीज व रेंज रोवरमधून फिरतात. त्या स्वतःच्या आहेत का? आदित्य ठाकरे रेंज रोव्हर वापरतात ती कोणाच्या मालकीची आहे. ठाकरेंच्या घरी एसी व्हिडियोकॉन कंपनीचा आहे. तो पण वेणुगोपाल धूत यांच्याकडून फुकट मिळाला आहे. ठाकरे वहिनींच्या हातामध्ये असलेले घड्याळ जुहूच्या कुठल्या शोरूम मधून घेतले, याचा खुलासा करावा. अन्यथा मी त्याचा खुलासा करणे, असा थेट इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर नितेश राणे म्हणाले, माजी खासदार अनिल देसाई हे स्वत: वहिनींना भाजी आणून देण्याचं काम करायचे. त्याचेच बक्षीस म्हणून त्यांना खासदार केले. ते एक कारकून आहेत. त्यामुळे ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश आहे. याचे धागेदोरे नव्हे भुयार गटार मातोश्रीपर्यंत पोहचले आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षण ओबीसीमधूनच द्या, या मागणीवर ठाम आहेत. यांवर नितेश राणे म्हणाले, आता सरकारने आरक्षण दिले. मुलं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. समाजामध्ये भांडत बसने योग्य नाही, असे नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
अस्तिकाला नागरूपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार
सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपाकडूनच सुरक्षाकवच, नाना पटोले यांचा हल्लाबोल