Friday, May 10, 2024

Latest Posts

अस्तिकाला नागरूपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार

छोट्या पडद्यावरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

छोट्या पडद्यावरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षक पसंती दर्शवत असतात.अशातच आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत रंजक वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे.या मालिकेत अस्तिकाला सर्वांसमोर नागरूपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार आहे. यज्ञ करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रूपालीमधील विरोचक नेत्राला घाबरू लागतो. अशातच नेत्रा आणि इंद्राणीला विरोचकाच्या सेवकाचे रूप घेतलेल्या अस्तिकाला सर्वांसमोर नागरूपात आणण्याचा मार्ग भालबांमुळे सापडतो. नेत्राबरोबर घरातले सर्वजण गरुडदेवाच्या आरतीची तयारी करतात, घरामध्ये गरुडदेवाची मूर्ती आणली जाते.

अस्तिकाला नागरूपात आणण्याचा मार्ग सांगितल्यानंतर भालबा आणि मंगला वावोशीला जायला निघतात. त्याचवेळी रूपाली दारात उभी राहून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करते. पण ते दोघेही ठामपणे रूपालीला तोडीस तोड उत्तर देतात. विरोचकाचा वध माझ्या नेत्राच्या हातून होणारच असा निर्धार ते व्यक्त करून निघून जातात. रूपाली त्यामुळे बिथरते. त्याच दिवशी अस्तिकाला गरुडाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागतात आणि ती हैराण होते आणि घाबरून रुपालीच्या खोलीत जाते. “विरोचका मला वाचवा” अशी विनंती ती करू लागते. पण अस्तिका आणि रूपाली दोघींनाही नेत्रा आणि इंद्राणीच्या खेळीचा अंदाज येत नाही आणि त्या दोघीही नेत्रा-इंद्राणीने युक्तीने टाकलेल्या जाळ्यात अडकतात.

अस्तिकाच्या अंगावर कात दिसल्याने इंद्राणीला अस्तिकाचा संशय येतो. त्यावेळी अस्तिका हे मी बाहेर नाग पाहिला त्यामुळे ती कात माझ्या अंगाला लागली असणार असल्याचं सांगते. पण तिच्या या बोलण्यावर अस्तिका आणि नेत्रा या दोघींनाही विश्वास बसत नाही. त्यामुळे अस्तिकाचं मूळ रुप समोर आणण्यासाठी नेत्रा आणि इंद्राणी कोणता डाव टाकणार आणि अस्तिकाला तिच्या मूळ रुपात आणण्यात यशस्वी होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. नेत्रा आणि इंद्राणीचा हा डाव यशस्वी झाला तर नागरूपात अस्तिकाला आणण्याची नेत्राची युक्ती यशस्वी होणार का? अस्तिका नागरूपात आल्यावर नेत्रा तिला कोणती शिक्षा देईल?  हे पाहणं आता औत्सुक्याच ठरणारं आहे.

हे ही वाचा:

पुण्यात ४०० हजार कोटीचे ड्रग्ज सापडणे हे पुणे पोलिसांचे अपयश; रवींद्र धंगेकरांचा आरोप

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चं प्रदर्शन मुंबई उच्च न्यायालयाने थांबवलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss