Saturday, July 27, 2024

Latest Posts

गोळीबार प्रकरणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल, एकनाथ शिंदे जबाबदार…

कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. काल रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. काल रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता सर्वत्र प्रतिक्रिया उमट आहेत. तर नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी चांगलाच हल्लबोल हा एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षांपासून माफिया व गुंडांचे राज्य सुरू आहे. महाराष्ट्रात जे राज्य आणले आहे ते झुंडशाही व गुंडगिरीतून राज्य आणले आहे. कालचा प्रकार उल्हासनगरचा नाही तर मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आहे व या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या त्रासातून,मनस्तापातून हा गोळीबार केला असल्याचे गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे. मी या गोळीबाराचे समर्थन करणार नाही. गृहमंत्री त्यांचे आहेत. पण त्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात गुन्हेगारच निर्माण होतील. वर्षभर सांगत आलो आहोत की मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारी टोळ्यांना दुरध्वनी जातात. उद्याच्या निवडणुकांसाठी मदत व्हावी यासाठी गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढले जात आहे. पुण्यात चार गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना राजकारणासाठी जामिनावर बाहेर काढण्यात आले. मुंबईमध्ये तेच सुरू आहे. कायद्याचे राज्य नाही तर फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत. पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जमीन देण्यासाठी सरकारमधील तीन मंत्र्यांनी कसा प्रयत्न केला याचे पुरावे देईल असं म्हणतं संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

तर पुढे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले आहेत की, सर्व गुन्हेगारी घटनांमध्ये राजकीय पाठबळ आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय काम करत आहे. महाराष्ट्र एवढा रसातळाला कधीच गेला नव्हता. गोळीबार केलेल्या आमदाराला जामीन देतील. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील राऊतांनी निशाणा साधला आहे. गृहमंत्री कुठे आहेत ? कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही असे बोलतात मग हा न्याय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी आहे का? चर्चा करण्याएवढे प्रकरण साधे आहे का ? सर्वसामान्य असते तर आता पर्यंत फासावर लटकवले असते. गृहमंत्री वक्तव्य करतील पण त्यांना आजच्या प्रकरणानंतर उत्तर द्यायला तोंड आहे का ? देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळने आता यावर बोलावे. देवेंद्र फडणवीस वकील आहेत ज्ञानी आहेत. राम तुमच्या बाजूने आहे असं संजय राऊत आज म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss