शिवसेना (ShivSena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट महाराष्ट्र लोकसभेच्या (Maharashtra Lok Sabha Elections) आगामी निवडणुकीत २३ जागा लढवणार असल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या (Congress) नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल, राज्यातील नाही,असे म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनवर टोला लगावला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही, जो निर्णय घेऊ शकेल, जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. सातत्याने त्यांना दिल्लीला विचारावं लागतं. त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करु, आम्ही २३ जागा लढवणारच, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये २५ जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने २५ नव्हे तर सर्व ४८ जागा लढवाव्या. आम्ही मात्र आमच्या २३ जागा लढवण्यावर ठाम आहोत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि जागावाटपाबाबत चर्चा केली. या संपूर्ण चर्चेत काय घडलं हे फक्त आम्हालाच माहित आहे. तसेच जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीमध्ये होईल, असे संजय राऊत म्हणाले.
तारीख पे तारीख तर सुरूच राहील, जेव्हा आमची वेळ येते त्यावेळी तारीख पे तारीख सुरू राहते. सर्वात मोठा गुन्हा तर या महाराष्ट्रात झाला आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील आमदार तोडून, फोडून, मोडून सरकार तयार करण्यात आले. ते बेकायदेशीर आहे, याबाबत बोला, इतर बाबतीत बोलू नका, असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
सरकारने २०२४ येण्याच्या आत आंतरवाली मधील सर्व गुन्हे मागे घ्यावे; मनोज जरांगे
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा