Saturday, July 27, 2024

Latest Posts

सरकारने २०२४ येण्याच्या आत आंतरवाली मधील सर्व गुन्हे मागे घ्यावे; मनोज जरांगे

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. जरांगे वेगवेगळ्या जिह्ल्यात जाऊन सभा घेत आहेत. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे नवनवीन मागण्या करत आहेत. सोयरे हा शब्द सरकारने लिहिला आहे, सगे सोयरे या शब्दांमुळे सर्व काही अडकले आहे, असे मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले. तसेच, आम्ही कुठेही जाहीर केले नाही, मुंबईत (Mumbai News) जाणार म्हणून त्यांनाच वाटतंय की, आम्ही मुंबईला यावं, असे जरांगे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळणारचं, असा ठोस दावा पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी केला आहे. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत कसा बसवायचा हे त्यांनी बघायला हवं, त्यातल्या दोन शब्द मुख्यमंत्र्यांनी पटलावर घेतले नाही. तो कागदही त्यांच्याकडे आहे, आम्हाला टाईम बॉण्डबाबत नाही बोललं तर बरं होईल, शब्द त्यांच्याच मंत्रीमंडळानं दिला, तोच त्यांनी पाळावा, ज्यांची १९६७च्या आधीची नोंद मिळाली, त्याच्या सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले पाहिजे. सगे सोयरे या शब्दांमुळे सर्व काही अडकले आहे. सरकारला २४ डिसेंबरचा वेळ आहे. त्यांनी सांगितले, मी जरांगे पाटलांना बोलणार नाही, तर मी पण नाही बोलणार. मराठा समाज कधीही एवढ्या प्रमाणात कधीही एकत्र आला नव्हता, आता तो आलाय. हेच सरकारला खुपतंय. याआधी तुम्ही नोटिसा देऊन प्रयत्न केला, मात्र तो आता होऊ देणार नाही. हे दोन पार्ट आहेत. हा मुद्दाच वेगळा आहे. आईच्या मुलालाच जर त्याचा लाभ मिळत नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे. एका शब्दावर ४ तास चर्चा झाली. त्यांनी लिहिलेल्या ४ ही शब्दावर आक्षेप, असे मनोज जरांगे म्हणाले.

सरकारने २०२४ येण्याच्या आतमध्ये आंतरवली मधील सर्व गुन्हे मागे घ्यावे. आता आंदोलन हाच पर्याय आमच्या समोर आहे. मराठा आरक्षणाबाबत मराठा आमदारांना काय वाटतंय हे आमदार बोलणार नाहीत. त्यासाठी तुम्ही आपलं म्हणून मराठा समाजाच्या मागे उभे राहा, सगळ्या पक्षातील मराठा आमदारांनी मंत्र्यांनी उभं राहवं, राज्य सरकारने सांगितलं होत आंतरवली आणि राज्यतील गुन्हे मागे घ्यावे, नाहीतर मराठा समाजाला वाटेल त्यांनी आम्हला फसवलं, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

संसदेत लोक कशी घुसली, असे विचारल्यानंतर आमचे निलंबन केले; संजय राऊत

LPG सिलेंडरच्या दरात घसरण, ‘या’ ग्राहकांना मिळणार ४० रुपयांची सूट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss