संजय राऊतांची जीभ म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली आहे – नितेश राणे

सध्या राजकारणामध्ये दावे प्रतिदावे असा खेळ सुरु आहे. त्याचसंदर्भामध्ये आपल्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचा रोज दावे प्रतिदावे असा खेळ चालतो.

संजय राऊतांची जीभ म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली आहे – नितेश राणे

सध्या राजकारणामध्ये दावे प्रतिदावे असा खेळ सुरु आहे. त्याचसंदर्भामध्ये आपल्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचा रोज दावे प्रतिदावे असा खेळ चालतो. आज भाजपचे नेते नितीश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना जिभेचे संशोधन करावे अशी विनंती नितेश राणे करणार आहेत. पुढे नितेश राणे म्हणाले की, एकादी व्यक्ती २४ तास कशी काय चाटूगिरी करू शकते याचा अभ्यास करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्यापेक्षा तुझ्या जिभेच काही तरी कर आता कारण तुझी जीभ म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली आहे असे ते म्हणाले.

पुढे नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी हे सचिन तेंडुलकर आहेत विराट कोहली आहे असे संजय राऊत आज बरळले आहेत मी त्यांना सांगेल की या दोन्ही क्रिकेटपटूंनी जगामध्ये भारताची मान उंचावली आहे. राहून गांधींनी काही दिवसापूर्वीच भारताची अमेरिकेमध्ये जाऊन बदनामी केली आहे. हे संजय राऊतांना कळतंय का? असा प्रश्न नितेश राणे यांनी संजय राऊतांना केला आहे. पुढे नितेश राणे म्हणाले की, काल राहुल गांधींच्या कार्यक्रमात आपलं राष्ट्रगीत सुरु असताना लोक उठून सुद्धा उभे राहिले नाहीत. राहून गांधींच्या मोहोब्बतच्या दुकानामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. हिरवे झेंडे फडकावले जातात यालाच राहुल गांधींची मोहब्बत म्हणायची का? असे सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

पुढे नितीश राणे म्हणाले की, राहुल गांधींना भारतामध्ये हिंदूंचे मतदान हवे असते तेव्हा हिंदू मंदिरामध्ये जाऊन साष्टांग नमस्कार घालत असतात आणि जेव्हा काही गाज नसते तेव्हा भारताच्या बाहेर जाऊन हिंदू धर्माची, देशाची बदनामी करत असतात. त्याला आपण विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर म्हणणार का? ज्या राहुल गांधींचे तुम्ही गोडवे गटाचे आणि चुटूगिरी करताय त्याच्या सभेमध्ये किती आयएसआयचे लोक होते. याची माहिती संजय राऊतने घ्यावी आणि नंतर त्यांची चाटूगिरी करावी. म्हणे १२ जूनला साले देशभक्त एकत्र येणार आहेत सगळे राष्ट्रद्रोही, सगळे गद्दार,पाकिस्तान समर्थक १२ जूनला एकत्र येणार आहेत असे नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version