Saturday, July 27, 2024

Latest Posts

संजय राऊत यांचा हल्लबोल, भ्रष्टाचार हा बीजेपीचा चेहरा

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा आणि राज्य सभा या निवडणुकांची. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा आणि राज्य सभा या निवडणुकांची. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. तर काहींनी पक्षाची साथ सोडत नवीन पक्षात एन्ट्री देखील केली आहे. परंतु आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. भाजप पक्षामध्ये एक मोठा चेहरा एन्ट्री करणार असल्याच्या बातम्या सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) हे भाजपच्या वाटेवर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Social activist Anjali Damania) यांनी हा दावा केला आहे. समाजसेविका अंजली दमानिया यांच्या या एक ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. आज सकाळीच दमानिया यांनी X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर प्रश्न विचारला होता. तसेच त्यांनी भुजबळांवर कडाडून टीकाही केली होती. तर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया देत भाजप वर हल्लाबोल हा केला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, मी काय बघू शकतो? ईडी ला विचाराव लागेल. ईडी अँटी करप्शन बीजेपी ने त्यांच्यावर आरोप लावले होते. तेव्हा नेत्यांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं. आता त्यांची फाईल भेटत नाही आहे. आता अंजली दमानिया यांच वक्तव्य ऐकल आहे. छगन भुजबळ कोणत्या पार्टीत जातील? काय करतील? याबद्दल मी बोलू शकत नाही. पण ते बीजेपीचा चेहरा बनू शकतात, असा जर म्हणणं असेल तर अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी त्यांचा चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचार हा बीजेपीचा चेहरा आहे. जो भ्रष्टाचारी बीजेपी सोबत चालेल तो पवित्र बनला जाईल.

तसेच पुढे महाविकास आघाडीसंदर्भात बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि लोकप्रिय नेते बाळासाहेब आंबेडकर हे आज चर्चेला बसणार आहेत. हे नक्की आहे. कारण आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला आहे. वंचित चा अधिकृतपणे समावेश केला आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आज आम्ही सर्व एकत्र बसणार. आम्हाला आनंद आहे. प्रकाश आंबेडकर स्वतः चर्चेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही ही हद्दपार करण्यासाठी स्वतः वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची मदत आमच्या लढाईत फार महत्वाची आहे. प्रकाश आंबेडकर सकाळी साडेअकरा वाजता स्वतः सहभागी होतील.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss