Thursday, May 16, 2024

Latest Posts

चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर होणार का? उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या वेगवगेळ्या मतदार संघांचा दौरा करत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या वेगवगेळ्या मतदार संघांचा दौरा करत आहे. आज ते सांगली दौऱ्यावर जाणार आहेत. सांगलीमध्ये त्यांच्या जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यामधील मिरजेत जनसंवाद मेळावा घेणार आहे. त्यामुळे आता सांगली लोकसभेच्या जागेवर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या नावाची ठाकरे घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर याच मतदार संघात काँग्रेसनेसुद्धा दावा केला आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्यांच्या सभेत कोणाच्या नावाची घोषणा करणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. मिरजेमध्ये आज संध्याकाळी ५ वाजता उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सांगलीच्या जागेवर काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांचे देखील नाव घेतले जात आहे. काँग्रेसचे नेतेही सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहील यावर ठाम आहेत, मात्र आज या सगळ्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे सांगलीमध्ये गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळाला जाऊन भेट देणार आहे. तसेच वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सांगलीच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचे उमेदवार असल्याने ठाकरे गट आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर उद्धव ठाकरे मतदारसंघांचा दौरा करत आहेत. ठाकरे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र दौरा करत आहेत. ठिकठिकाणी जाऊन त्यांनी जनसंवाद मेळावे घेतले आहेत. त्यातच आज उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. आज सांगलीमधील मिरजमध्ये जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करणार का?हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

हे ही वाचा:

डॉ. भूषण गगराणी यांनी स्वीकारला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

सिंदखेडराजामधील सभेत उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका; गद्दारीला मते देऊ….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss