Tuesday, April 23, 2024

Latest Posts

शांतीगिरी महाराज आगामी लोकसभा निवडणुकी लढणार, पुन्हा एकदा राजकारणात उतरण्याची घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर नाशिक शहराला राजकीय महत्व वाढले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर नाशिक शहराला राजकीय महत्व वाढले आहे. राजकारणाच्या दृष्टीने नाशिक शहराचे महत्व वाढले आहे. येणारी निवडणूक पाहता सगळीकडे सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. आता नाशिकमधील वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका लढणार आहेत. ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये भक्त परिवाराचे प्रमुख तसेच वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूका लढवण्याच्या तयारीत आहेत. २००९ साली शांतिगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष लोकसभेची निवडणूक लढविली होती. निवडणूक निवडून आल्यानंतर ते तिसऱ्या नंबरचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासमोर आव्हान ठेवले होते. त्यानंतर काही काळ महाराज निवडणूका आणि राजकारणापासून दूर होते. त्यांचा नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा भक्त परिवार आहे. काही दिवसांपूर्वी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक अनुष्ठान पार पडले होते. या सोहळ्यासाठी त्यांचा मोठा भक्तपरिवार उपस्थित होता. नाशिक जिल्ह्यात त्यांचे मूळ गाव असल्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे.

काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा केला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि शांतिगिरी महाराजांचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मोदींनी रामकुंडावर (Ramkund) गोदापूजन केल्यानंतर ते महाराजांना भेटले होते. लोकसभेच्या तयारीला लागा, असा संदेश पंतप्रधान मोदींकडून त्यावेळी देण्यात आला होता, अश्या चर्चाना आता उधाण आले आहे. शांतिगिरी महाराज हे आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्प्ष्ट करणार आहेत. लोकसभा निवडणुकीबाबत आज शांतीगिरी महाराज काय बोलणार? हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे.

हे ही वाचा:

अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे ‘बिग बॉस १७’चा विजेता,जाणुन घेऊयात मुनव्वर फारुकीचा प्रवास…

आजपासून मनोज जरांगे रायगड दौऱ्यावर, असा असणार जरांगेंचा दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss