Saturday, May 18, 2024

Latest Posts

बीडमध्ये शरद पवारांनी घेतली जाहीर सभा, सभेत जितेंद्र आव्हाड म्हणाले…

शरद पवारांची (Sharad Pawar) आज बीडमध्ये (Beed) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp's Congress) फुटीनंतर शरद पवारांनी जाहिर केल्याप्रमाणे आज बीडमध्ये सभा घेण्यात आली.

शरद पवारांची (Sharad Pawar) आज बीडमध्ये (Beed) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp’s Congress) फुटीनंतर शरद पवारांनी जाहिर केल्याप्रमाणे आज बीडमध्ये सभा घेण्यात आली. यसभेत बरेच राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि आमदार, खासदार हजर होते. शरद पवारांच्या मागे सगळे माजी आमदार बसले आहेत. आणि त्यांचे नातू पुढे उभे आहेत. ती पिढी तुमच्यासोबत लढली आणि त्यांची नातवं तुमच्यासाठी लढायला तयार झाली, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज बीडमधून केले होते. शरद पवारांचा आज बीडमध्ये दौरा होता. येथे ते जनसमुदायाला संबोधित करणार होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीही संभाषण केले.

“जो नैसर्गिक नियम आहे की मुलगा सोडून गेला तरी नातू आजोबाला सोडत नसतो. साहेब इथे बसलेली सगळी नातवं तुम्हाला धरून चालणार आहेत”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. “तुम्हाला पुढे करून आम्हा सर्वांनाच बीड जिल्ह्याचा माहौल शरद पवारमय करायचा आहे. बीड हा भगवान बाबांचा जिल्हा, समतेचे पुजारी असलेल्या भगवान बाबांचा जिल्हा आहे. बीड गोपिनाथ मुंडेंचा (Gopinath Munde) जिल्हा आहे.

आपल्याला माहितेय गोपिनाथ मुंडे यांच्यासोबत आपले अतिशय चांगले संबंध. मी विरोधी पक्षात असताना माझ्यावर केस झाली तेव्हा माझी पत्नी त्यांना भेटायला गेली. तेव्हा त्यांनी विचारलं, ‘जितेंद्र का नाही आला?’ तर ‘त्याला लाज वाटते, त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला होता’, असं माझी बायको म्हणाली. ते म्हणाले, ‘वेडा आहे तो, राजकारणात हे सर्व करायचं असतं. पण त्याच्यावर खोटी केस पडली, त्याचं आयुष्य बरबाद होऊ देणार नाही, त्याची केस एक मिनिटांत मागे घ्यायला लावतो.’ याच गोपिनाथ मुंडेंनी माझ्यावर स्वकियांनी केलेली केस १५ दिवसांत मिटवून फाईल फेकून दिली”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा:

ODI World Cup 2023 : टीम इंडियाच्या वनडे वर्ल्डकप संघातून ‘हे’ खेळाडू बाद…

पुण्यातील ‘या’ रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss